पक्षाचा स्वबळाचा आदेश आहे, आता मी इकडून आणि तुम्ही तिकूडन भाषण ठोकायचे..

पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज खुमासदार भाषणात जोरदार फटकेबाजी केली. राज्यमंत्री बनसोडे यांना देखील त्यांनी चिमटे काढले.
minister amit deshmukh press -sanjay Bansode  news Latur
minister amit deshmukh press -sanjay Bansode news Latur

उदगीर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी केली.(The party has its own order, now I want to make a speech from here and there.)

शिवाजी महाविद्यालयात आरटीपीसीआर लॅब व ऑक्सीजन टॅंक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. (Minister Amit Deshmukh, Maharashtra) यावेळी देशमुख म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात आरोग्य विभागाचे काम पहिल्या क्रमांकावर आहे. (State Minister Sanjya Bansode, Udgir) मराठवाड्यातील तालुकास्तरावरील पहिली कोरोना तपासणी प्रयोगशाळा उदगीरला होत आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍सिजन कमी पडू नये म्हणून ऑक्सिजन टॅंकची सोय करण्यात आली आहे. या भागातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यात कोरोना काळात लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. यापुढेही उदगीरला आरोग्याच्या बाबतीत कुठलीच कमतरता भासू देणार नाही. येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केल्याप्रमाणे स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या हेतूने सर्व जागा लढवून कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे ही भावना काँग्रेसची आहे. निवडणुकीनंतर आघाडी होणारच आहे याची आठवण त्यांनी यावेळी करून देत बनसोडे तुम्ही तिकडून भाषण द्यायचे आणि मी ईकडून भाषण देणार आहे. शेवटी तुम्हाला भाषण लिहून देणारा माझ्या ओळखीचाच असल्याचे सांगत कोपरखळी मारली.

राज्यमंत्री  बनसोडे म्हणाले, उदगीर मतदार संघामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. पालकमंत्र्यांच्या सहकार्याने या भागातील प्रश्न, विकास कामे व आवश्यक असणारा निधी दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये भरभरून मिळाला आहे, यापुढेही मिळत राहावा अशी अपेक्षा आहे.

देशमुखांच्या फटकेबाजीने नेतेमंडळी घायाळ

पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज खुमासदार भाषणात जोरदार फटकेबाजी केली. राज्यमंत्री बनसोडे यांना देखील त्यांनी चिमटे काढले.  जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे यांनी अध्यक्षपदाचा जिल्हा परिषदेत फॉर्म भरला असताना पालकमंत्री देशमुखी यांनी काँग्रेसचा फॉर्म परत घेण्यास सांगितले व मला बिनविरोध निवडून दिले ह्या बद्दल त्यांचे आभार मानले.

यावर भाजपात तुमची घुसमट होत असून काँग्रेसमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य आहे, ईकडेच या असे म्हणत केंद्र यांना काॅंग्रेसमध्ये येण्याची आॅफरही दिली. राज्यमंत्री बनसोडे तुम्ही अजिबात घाबरू नका, विरोधी पक्षाकडे आता पर्याय नाही आणि जर असेलही तर राहुल केंद्रे ती अडचण दूर करतील तुम्ही बिनधास्त राहा, असा सल्ला देताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.

Edited  By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com