हायवे ठेकेदाराचा पालकमंत्र्यांनाही ठेंगा :  परशुराम उपरकर   

.
kesarkar_Uparkar
kesarkar_Uparkar

कणकवली  :  पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या दौऱ्यानंतर देखील मुंबई-गोवा महामार्गाची खड्डेमय स्थिती जैसे थे आहे. बीएसएनएलचे लॅडलाईन सुरू झालेले नाहीत. सर्व्हिस रोड सुरू कार्यान्वित झाला नाही आणि धोकादायक इमारतीही हटल्या नाहीत. पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही हायवे ठेकेदाराने त्यांना ठेंगा दाखवला आहे. तर हायवे प्रशासनानेही पालकमंत्र्यांचे आदेशाला केराची टोपली दाखवली आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

येथील मनसे संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शैलेंद्र नेरकर, संतोष सावंत उपस्थित होते. श्री.उपरकर म्हणाले, " महामार्ग अभियंत्यांवरील चिखलफेक आंदोलनानंतर पालकमंत्री केसरकर यांनी खारेपाटण ते झाराप असा दौरा केला. कणकवली शहरातील खड्डेमय रस्त्यांचीही त्यांनी पाहणी केली. कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन पंधरा दिवसांत सर्व समस्या सुटतील अशी ग्वाही दिली. तर हायवे ठेकेदार आणि हायवे प्रशासनाला महामार्ग सुस्थितीत ठेवण्याचे आदेश दिले होते.''

ते म्हणाले, " पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी कणकवली शहरासह खारेपाटण ते कुडाळ हद्दीपर्यंत महामार्गावरील खड्ड्यांची समस्या जैसे थे राहिली आहे. बीएसएसएनलचे 1 हजार पेक्षा अधिक फोन बंद आहेत; मात्र यातील एकही सुरू झालेला नाही. हायवे प्रश्‍नी ठेकेदार आणि हायवे प्रशासन देखील ढिम्म राहिले आहे. पालकमंत्र्यांचे आदेश या दोन्ही यंत्रणांनी झिडकारले असल्याने सर्वसामान्य जनतेला खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.''


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com