परभणीत पेट्रोल शंभरी पार, तर डिझेलही नव्वदीच्या दिशेने..

दोन महिन्यांपुर्वी दरदिवसाला पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत होत्या. परंतु पाच राज्यातील निवडणुकांमुळे याला काही प्रमाणात ब्रेक लागला होता.
Parbhani Petrol Disel Price Hike News
Parbhani Petrol Disel Price Hike News

परभणी ः कोरोनामुळे लाॅकडाऊन आणि कडक निर्बंध असल्यामुळे आधीच राज्यातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यातच पेट्रोलचे दर आकाशाला भिडत आहेत. (Petrol price Hike in Parbhani)  राज्यात परभणीत पेट्रोलने शंभरी गाठली. आज परभणीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी १०१ तर डिझेलसाठी ८९.७८ पैसे मोजावे लागले. पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रत्येकी ०६ पैशांनी वाढ झाली आहे.

दोन महिन्यांपुर्वी दरदिवसाला पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत होत्या. परंतु पाच राज्यातील निवडणुकांमुळे याला काही प्रमाणात ब्रेक लागला होता. मात्र निवडूका होऊन निकाल जाहीर झाले आणि पुन्हा दरवाढीने तोंड वर काढले. ( petrol price in Parbhani now Hundred per liter) गेल्या काही दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किंमती पुन्हा शंभरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परभणीत राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोलची आज नोंद झाली.

पेट्रोलच्या भावात ०६ पैशांची वाढ झाल्यामुळे पेट्रोल १०१ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलमध्ये ०६ पैशाची ची वाढ होऊन ८९ रुपये ७८ पैसे म्हणजेच नव्वदी जवळ पोहचले. ( Disel price near About Ninty)पेट्रोलच्या किमतीत नितनियमाणे वाढत होत असल्याने परभणीकर हैराण झाले आहेत. 

डिझेलही नव्वदीकडे..

परभणीत मागील वर्षी ४ ऑक्टोबरमध्ये पेट्रोल ९३ रूपये १३ पैसे इतक्या उंच्चाकी दराने विकलेे गेले होते. हा दर यावेळी मोडीत निघाला असून आज परभणीत वाहन धारकांना पेट्रोल १०१ रुपये इतक्या दराने खरेदी करावे लागत आहे. काल  पेट्रोलचा भाव ९९ रुपये ९५ पैसे होते, त्यात आज सहा पैशांनी वाढ झाली.  तर डिजेल काल ८९.७२ पैसे होते, यात देखील सहा पैशांनी वाढ होऊन ते ८९.७८ म्हणजे नव्वदीच्या जवळ पोहचले.

आधीच कोरोणामुळे नागरिकाच्या होत्या त्या नोकऱ्या गेल्या. गेल्या वर्षभरापासून हाताला काम नसून जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नाही. शेतीवरच जिल्हाचे अर्थकारण अवलंबून आहे.  त्यात पेट्रोलचे भाव हे सातत्याने वाढत असल्याने परभणीकरांचे कंबरडे मोडले आहे. 

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com