भारत भालके कॉंग्रेसमध्ये राहो, की भाजपत जावो; विरोधात कोण?

मोदी लाटेमध्येही कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना या मतदारसंघातून 7 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. आमदार भारत भालके हेच कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार असतील असे आडाखे बांधले जात आहेत.
भारत भालके कॉंग्रेसमध्ये राहो, की भाजपत जावो; विरोधात कोण?

मंगळवेढा - मोदी लाटेमध्येही कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना या मतदारसंघातून 7 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. आमदार भारत भालके हेच कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार असतील असे आडाखे बांधले जात आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर आणि पंढरपूर भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला आधीक पुष्टी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. जर त्यांनी भाजपात प्रवेश केला तर त्यांच्या विरोधात संभाव्य ताकतीचा उमेदवार कोण आणि जर ते कॉंग्रेसमध्ये राहिले तर त्यांच्या विरोधात कोण, याचीही चर्चा सुरू आहे. 

गतनिवडणुकीत भाजप आणि स्वाभिमानीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा ही जागा स्वाभिमानीकडे होती. परंतु आज स्वाभिमानी भाजपाबरोबर नाही. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा की भाजपचा दावा राहणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारी गृहीत धरून शैला गोडसे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक घरोघरी व प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावत त्या उमेदवारीचा दावा करत आहेत. परिचारक यांच्या पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचा संभाव्य उमेदवार कोण हे जरी निश्‍चित केले नसले तरी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्‍यासाठी आमदार निधी व मुख्यमंत्री सडक योजनेसाठी पाठपुरावा केल्याचे दिसून आले आहे. 

आमदार भारत भालके भाजपावाशी झाले तर त्यांच्याविरोधात आतापर्यंत प्रयत्न करून संभाव्य उमेदवाराच्या शर्यतीत असलेले जि.प. सदस्या शैला गोडसे, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे याशिवाय इतर अपक्ष उमेदवाराचा विचार करता हे निवडणूक चुरशीची होणार असल्याची शक्‍यता असली तर संभाव्य राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार कोण हेच अद्याप निश्‍चित नसल्यामुळे या मतदारसंघातील वातावरण सध्यस्थितीला गोंधळाचे आहे. 

या गोंधळलेल्या वातावरणात मात्र सर्वसामान्य मतदार आणि प्रश्न मात्र बाजूला पडले आहेत. त्यामध्ये बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असो रब्बी दुष्काळ निधी पासून तालुका वंचित, तुरीचा पिक वाढण्यापासून वंचित, आंबा बहार डाळिंबाचा विमा देताना केलेला पक्षपातीपणा, तालुक्‍यातील रस्ते, आरोग्य ,शिक्षण हे प्रश्न मात्र अजून तसेच राहिले आहेत. परंतु या प्रश्नाच्या अडचणीत मात्र राजकीय भेटीगाठीला मात्र उधाण आलेले आहे
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com