अजिंक्यतारा साखर कारखाना उभारणार ऑक्सिजननिर्मिती प्लांट

या प्लांटमध्ये २४ तासांत प्रत्येकी १२ किलो ऑक्सिजनचे ९० जम्बो सिलिंडर भरले जाणार आहेत. वैद्यकीय सेवेसाठी उत्पादित केला जाणाऱ्या या ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के असणार आहे. येत्या महिना अखेरीस हा प्लांट सुरु होणार असून याचा फायदा जिल्ह्यातील रुग्णालयांना आणि पर्यायाने रुग्णांना होणार आहे.
अजिंक्यतारा साखर कारखाना उभारणार ऑक्सिजननिर्मिती प्लांट
Oxygen production plant to be set up at Ajinkyatara Sugar Factory

सातारा : कोरोना रुग्णांना (Corona Patients) ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा व्हावा या उदात्त हेतूने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने (Ajinkyatara Sugar factory) ऑक्सिजननिर्मिती प्लांट (Oxygen Plant) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत प्लांट सुरु होईल आणि त्याद्वारे विविध रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी दिली आहे. (Oxygen production plant to be set up at Ajinkyatara Sugar Factory)

ऊस पुरवठादार सभासद, शेतकऱ्यांना नेहमीच उच्चतम दर देऊन राज्यातील एक आदर्श सहकारी संस्था असा नावलौकिक मिळवलेल्या अजिंक्यतारा कारखान्याने विविध उपक्रमांतून सातत्याने सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकीतही अग्रेसर राहणाऱ्या या कारखान्याने सध्याची गंभीर परिस्थिती ओळखून कोरोना महामारीमध्ये रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आणि ऑक्सिजन अभावी रुग्णांची होणारी जीवघेणी हेळसांड थांबावी. यासाठी ऑक्सिजननिर्मिती प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही थैमान घातले आहे. दररोज दोन हजारच्या पटीने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत आणि बेड मिळाला तर ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही.  त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि संचालक मंडळाने कारखाना कार्यस्थळावर ऑक्सिजननिर्मिती प्लांट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अजिंक्यतारा कारखान्यावरील या प्लांटमध्ये हवेतील ऑक्सिजन गोळा करून तो सिलिंडरमध्ये भरला जाणार आहे. 

या प्लांटमध्ये २४ तासांत प्रत्येकी १२ किलो ऑक्सिजनचे ९० जम्बो सिलिंडर भरले जाणार आहेत. वैद्यकीय सेवेसाठी उत्पादित केला जाणाऱ्या या ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के असणार आहे. येत्या महिना अखेरीस हा प्लांट सुरु होणार असून याचा फायदा जिल्ह्यातील रुग्णालयांना आणि पर्यायाने रुग्णांना होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in