एसटी आंदोलनाचा तिढा सुटणार? परबांनी दिली चांगली ऑफर!

सरकार दोन पावले पुढे यायला तयार आहे, असे अनिल परब (Anil Parab ) म्हणाले.
एसटी आंदोलनाचा तिढा सुटणार? परबांनी दिली चांगली ऑफर!
Anil Parab Sarkarnama

पुणे : गेल्या पंधरा दिवसापासून एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी एसटी कर्मचीऱ्यांनी काम बंद (ST Strike) आंदोलन सुरू केले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज (ता.23 नोव्हेंबर) परिवहन मंत्री अनिल परब, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यात सुमारे दोन तास बैठक झाली. या बैठकीनंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

Anil Parab
राज्यातील हिंसेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून करा

यासंदर्भात पुन्हा उद्या (ता.24 नोव्हेंबर) सकाळी बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. यामुळे एसटी कामगारांच्या आंदोलनावर तोडगा निघण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

अनिल परब म्हणाले की, कोर्टाने एसटी महामंडळ विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. मात्र, तोपर्यंत संप चालू राहू नये. कामगारांना अंतरिम वाढ देण्याचा पर्याय दिला आहे. आम्ही पैशाची ऑफर दिली नाही. संघटनेला दोन-तीन पर्याय दिले आहेत. वाढ दिल्यानंतर समितीने एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय दिला तर विलीनीकरणानंतरही पगारवाढ दिली जाईल. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आम्ही चांगली ऑफर दिली आहे. याबाबत पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Anil Parab
विश्वजित कदमांच्या मावसभावाचा पराभव घडवत जगतापांनी मुलाच्या पराभवाचा हिशेब चुकता केला

कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलीनीकरणाची मागणी लावून धरल्याने मागणीबाबत तिढा कायम होता. आज कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, खोत, पडळकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. वेतन वेळेवर मिळावे. वेतन वाढ व्हावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. उच्च न्यायालयाने बनवलेल्या समितीकडे हा विषय आहे. 12 आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. मुख्यमंत्री तो कोर्टात सादर करतील. कोर्टाच्या आदेशाचे कोणीच उल्लंघन करू शकत नाही. कामगारांना जे हवे आहे ते आम्ही देत आहोत. समितीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यास वेळ लागणार आहे. तिढा कायम राहू नये यासाठी तोपर्यंत दुसरा पर्याय असेल तर द्यावा. अंतरीम वाढचाही पर्याय आहे, असे परबांनी सांगितले. याबरोबरच कामगारांनी आंदोलन ताणू नये. सरकार दोन पावले पुढे यायला तयार आहे. तुम्हीही दोन पावले मागे घ्या चर्चेने मार्ग काढू याबरोबरच कामगारांनी संप मागे घ्यावा, असे आवाहनही परबांनी यावेळी केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in