वडेट्टीवारांच्या भाषणात आणला खोडा, अन् आमदार भांगडियांवर झाले गुन्हे दाखल...

विना परवानगी बाईक रॅली काढली. यामुळे पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देश व आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. आमदार भांगडिया यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वडेट्टीवारांच्या भाषणात आणला खोडा, अन् आमदार भांगडियांवर झाले गुन्हे दाखल...
Vijay Wadettiwar - Bhangdiya

चिमूर (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार Guardian Minister of Chandrapur Vijay Wadettiwar १६ ऑगस्टला चिमूर क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे शहिदांना मानवंदना देऊन मनोगत व्यक्त करीत होते. दरम्यान आमदार बंटी भांगडिया MLA Bunty Bhangdiya यांची बाईक रॅली तेथे पोहोचली आणि कार्यकर्ते विविध घोषणा देऊ लागले. ही रॅली विनापरवानगी काढल्याने पोलिसांनी आमदार भांगडियांसह ८ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. 

भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. चिमूर क्रांती शहिद स्मृतीदिनानिमित्त शहिदांना मानवंदना देण्याकरिता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा नियोजित शासकीय दौरा होता. या नियोजित कार्यक्रमानुसार चिमूर महामार्गानजिकच्या हुतात्मा स्मारक येथे विजय वडेट्टीवार आपले मनोगत व्यक्त करीत होते. यादरम्यान आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात बाईक रॅली नेहरू चौकातुन हुतात्मा स्मारकाच्या समोर आली. तिथुन पुढे न जाता मोठ्याने जिल्ह्यासंबंधी तथा इतर घोषणा देणे सुरु केले. ज्यामुळे काही काँग्रेस कायकर्त्यांनी रॅलीजवळ येऊन रॅली पुढे घेऊन जाण्यास सांगितले. यामुळे भाजप कार्यकर्ते संतापले. त्यानंतर तणाव निर्माण झाला. आता धुमचक्री होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले. 

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत कोणत्याही गर्दी होणाऱ्या राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, निवडणूक प्रचार, सभा, रॅली मोर्चे यावर बंदी घालण्यात आली आहे. याउपर विना परवानगी बाईक रॅली आमदार भांगडिया यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. यादरम्यान पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देश व आदेशाचे उल्लंघन करण्यात आले, असा ठपका ठेऊन आमदार भांगडिया, गोलू भरडकर, अजित सुकारे, राजू देवतळे, विवेक कापसे, नैनेश पटेल, कन्हैयासिंग भौंड, पिंटू उर्फ विशाल खाटीक, स्वप्नील शेंडे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६, १८७, १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इतर ३० व्यक्तींची ओळख करणे सुरू आहे. ज्यामुळे गुन्हा नोंदविलेल्या व्यक्तींची संख्या चौकशी अंती वाढू शकते, अशी माहिती सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. 

विना परवानगी बाईक रॅली काढली. यामुळे पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देश व आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. आमदार भांगडिया यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य व्यक्तींची ओळख सुरू आहे. 
- नितीन बगाटे, सहायक पोलिस अधीक्षक, चिमूर.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.