संभाजीराजेंच्या पत्राची काही तासातच दखल; रायगडावरील 'ती' रंगरंगोटी हटवली

रायगडावर (Raigad) 'मदार मोर्चा' या ठिकाणी काही अज्ञातांकडून रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
Chhatrapati Sambhajiraje

Chhatrapati Sambhajiraje

Sarkarnama

पुणे : रायगडावर (Raigad) गेल्या काही दिवसापुर्वी 'मदार मोर्चा' (Madar Morchya) या ठिकाणी काही अज्ञातांकडून रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेबाबत अनेक शिवभक्तांकडून याबाबत सोशल माध्यमावर यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. ही बाब खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांच्याही निदर्शनात काही शिवभक्तांनी आणल्यानंतर त्यांनी लगेचच पुरातत्व विभागाकडे याबाबत पत्रव्यव्हार केला आणि यावर तत्काळ कारवाईची मागणी केली. यास पुरातत्व विभागाने काही तासातच प्रतिसाद देत येथील रंगरंगोटी व प्रार्थनास्थळ करण्याचा खोडसाळपणा उधळून लावला व येथील 'मदार मोर्चा' हे ठिकाण पुर्ववत केले आहे. याबाबतची माहिती संभाजीराजेंनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Chhatrapati Sambhajiraje</p></div>
खासदार संभाजीराजेंचा थेट पुण्यात जनता दरबार!

छत्रपती संभाजीराजेंनी पुरातत्व विभागास लिहलेल्या पत्रात म्हटले की, "महोदय,किल्ले रायगड येथील 'मदार मोर्चा' या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिले आहे.ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी मदार मोर्चा याठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा." अशी मागणी त्यांनी केली होती.

संभाजीराजे यांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका व मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांना पत्र पाठवले व त्यांच्याशी संपर्क साधून रायगडावर होत असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली आणि तत्काळ योग्य ती कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती. यानंतर काही तासातच येथे करण्यात आलेली रंगरंगोटी आणि येथे प्राथनास्थळ करण्याचा खोडसाळपणा करणाऱ्यांचा मनसुबा उधळला आहे. पुरातत्व विभागाकडून लगेचच करण्यात आलेल्या कारवाई बाबतची माहिती आणि रायगडावरील 'मदार मोर्चा' या ठिकाणचा पुर्ववत झालेला फोटो आणि येथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी शेअर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com