राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक जिल्हा प्रभारीची यादी जाहीर - NCP announces list of youth district in-charge | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक जिल्हा प्रभारीची यादी जाहीर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची जिल्हा प्रभारी यादी प्रसिध्द केली.

बारामती : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची जिल्हा प्रभारी यादी प्रसिध्द केली. यात बारामतीचे किशोर मासाळ यांची अहमदनगर, नाविद मुश्रीफ यांची सांगली, शरद लाड- सोलापूर, राकेश कामठे- कोल्हापूर, निखिल ठाकरे- नागपूर, अभिषेक बोके- ठाणे, मयूर गायकवाड- कल्याण डोंबिवली, सत्यजित शिसोदे- नंदूरबार, ऋतुराज हलगेकर- गोंदिया, जगन्नाथ काकडे- औरंगाबाद तर संतोष मुंडे यांची हिंगोलीच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्हा व तालुक्यांच्या युवकांच्या सर्व संघटनांमध्ये समन्वय साधण्यासह युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्ष संघटना व सरकार यांच्यामध्येही दुवा बनण्याचे काम हे प्रभारी करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसची ध्येय धोरणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती नगरचे प्रभारी किशोर मासाळ यांनी दिली. युवकांच्या माध्यमातून संघटना मजबूत करणे आणि सर्वच प्रकारच्या निवडणुकांना सामोरे जाताना युवकांचे संघटन अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने पक्षीय पातळीवर ही यादी आज जाहीर करण्यात आली. 

आगामी काळात शासकीय समित्यांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत, या नियुक्त्यांमध्येही हे प्रभारी महत्वाची भूमिका बजावणार आहेत. सर्व प्रकारच्या निवडणूकांमध्ये आता युवकांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते, सोशल मीडिया हाताळण्यापासून सर्वच वयोगटातील मतदारांपर्यंत पक्षीय विचार प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम युवक अधिक प्रभावीपणे करु शकतात, ही राष्ट्रवादीची विचारधारा असल्याने या प्रभारीच्या नियुक्त्यांना विशेष महत्व दिले जात आहे. 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेंच्या घरासमोर मराठा समाजाचा आक्रोश...
वालचंदनगर : .न्यायालयाने मराठा आरक्षणला स्थगिती दिल्यामुळे राज्यभर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन सुरु झाली आहेत. भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चा इंदापूर तालुकातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले. 

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे व मराठा समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी भरणेही यांनीही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. भरणे यांनीही आंदोलनामध्ये सहभागी होउन मराठा समाजाची भूमिका ठामपणे मांडण्याची ग्वाही दिली 

आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर इंदापूर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाने आक्रोश आंदोलन केले. यावेळी युवकांनी राज्यमंत्री भरणे यांना मराठा समाजाची भूमिका सरकारकडे ठामपणे मांडून हक्काचे आरक्षण मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी भरणे यांनी ही मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी भरणे यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाच्या आंदोलनास माझा पाठिंबा असून मराठा समाजाची भूमिका सरकारकडे ठामपणे मांडणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत, असे भरणे यांनी सांगितले. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख