भाजपची महानगरपालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी नाना पटोले लागले कामाला...

हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे खबरदारी घेतली गेली होती. पण १२ तासांत तब्बल ७०० मीमी पाऊस पडेल, हा अंदाज हवामान खात्यानेही वर्तविला नव्हता. ढगफुटी झाल्यावर मोठमोठ्यांचा नाइलाज होतो. पण दुर्घटना घडल्यानंतर सरकारने तातडीने उपाययोजना करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.
भाजपची महानगरपालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी नाना पटोले लागले कामाला...
Nana Patole

नागपूर : दिल्ली येथे राहुल गांधी Rahul Gandhi यांची भेट घेऊन आल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांच्या स्वबळाच्या नाऱ्यातील जोर वाढला आहे. आज त्यांनी शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकी घेतल्या. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Former Chief Minister and Opposition Leader Devendra Fadanvis यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांना बैठकांना सुरुवात केली. त्यामुळे महानगरपालिकेतील भाजपची सत्ता हिसकावून घेण्याची कॉंग्रेसची तयारी सुरू झाल्याचे दिसतेय. 

आज सकाळी नागपुरात पोहोचल्यानंतर नाना पटोलेंनी बैठकांचा सपाटा सुरू केला. आत्ताही ते एका बैठकीत व्यस्त आहेत. त्यांनी केलेल्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत त्यांना विचारले असता, कॉंग्रेस स्वबळावर लढणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ते पॉलिसी मॅटर आहे. वारंवार त्याचा उल्लेख करणे योग्य नाही. आपला पक्ष वाढवणे, हे काही गैर नाही. या सर्व त्यातील प्रक्रिया आहेत आणि या प्रक्रिया आता सुरू राहणार आहेत. निवडणुकीच्या वेळी हे सर्व बघायला मिळणारच आहे, असे त्यांनी सांगितले. डिझेल, पेट्रोल, गॅस, जीवनावश्‍यक वस्तू, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आदींना प्राधान्य देणे हे कॉंग्रेसचे काम आहे आणि आम्ही सरकारकडे त्याचा पाठपुरावा करतो आहे, असेही ते म्हणाले. 

सांभाळली नितीन राउतांची बाजू...
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. सर्व विभागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये महावितरणचेही खांब कोसळले, वाहून गेले, तारा तुटल्या. असे असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत कुठे दिसले नाही, असा प्रश्‍न विचारला असता नाना म्हणाले, कुणी दिसले नाही म्हणजे ते कामच करत नाहीत, असा अर्थ होत नाही. आज उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री आपआपली कामे योग्यरीत्या करीत आहे. कुणी कुठे पोहोचले, नाही पोहोचले, हे विषय काढून राजकारण करण्याची ही वेळ निश्‍चित नाही, असे सांगत त्यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्याबद्दल अधिक बोलणे खुबीने टाळले. 

हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे खबरदारी घेतली गेली होती. पण १२ तासांत तब्बल ७०० मीमी पाऊस पडेल, हा अंदाज हवामान खात्यानेही वर्तविला नव्हता. ढगफुटी झाल्यावर मोठमोठ्यांचा नाइलाज होतो. पण दुर्घटना घडल्यानंतर सरकारने तातडीने उपाययोजना करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये थोडाही वेळ वाया जाऊ दिला नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.