शरद पवारांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी योग्य भूमिका मांडली...

माझे मेट्रोच्या एमडींशी बोलणं झाले आहे. मंत्रालयात या विषयावर बैठक घेणार आहो. त्यांना ताकीद देऊ. नाहीतर विधिमंडळ मागासवर्गीय समितीला विनंती करू. मग ते कायद्यानुसार कारवाईला पात्र राहतील.
शरद पवारांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी योग्य भूमिका मांडली...
Sharad Pawar - Wadettiwar - Patole.

नागपूर : जमीनदारांच्या जमिनी गेल्या अन् हवेली राहिल्या. आता त्याचा डागडुजी करण्याचीही ऐपत त्यांची राहिली नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार President of NCP Sharad Pawar यांनी कॉंग्रेसला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना कॉंग्रेसने ज्या लोकांना जमीन राखायला दिली, त्यांनी जमीन चोरली आणि दरोडा घातला, असा प्रतिहल्ला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of Congress Nana Patole यांनी पवारांवर चढवला. या बाबतीत आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Minister Vijay Wadettiwar यांना विचारले असता, ‘आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी योग्य भूमिका मांडली आहे.’, असे म्हणत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. 

यावेळी माध्यमांशी बोलताना मुंबईच्या साकीनाका परिसरात महिलेवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, महिला सुरक्षेचा प्रश्न केवळ राज्यातच नव्हे तर देशात ऐरणीवर आला आहे. संपूर्ण देशातच अशा घटना वाढत आहे. मध्य प्रदेशात तक्रारदार पीडित महिला पोलिसांच्या ताब्यातून गायब होण्याची घटना घडली. सगळीकडेच आता मुली व महिलांवरील घटनेत वाढ होत आहे. यापुढे घटना होऊ नये यावर फोकस राहणार आहे. गृहमंत्र्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

मेट्रोच्या कार्यालयावर स्वतः धडकणार...
महामेट्रोत आरक्षण डावलून नोकरभरतीचा आरोप होत आहे. याबाबत प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. त्याची आम्ही नक्कीच दखल घेऊ. मीसुद्धा मेट्रोच्या कार्यालयावर धडक देणार आहे. सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन जाणार आहे. यापुढील भरतीत मात्र मेट्रोला मागासवर्गीयांचा कोटा पूर्ण करावाच लागेल. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिला. 

माझे मेट्रोच्या एमडींशी बोलणं झाले आहे. मंत्रालयात या विषयावर बैठक घेणार आहो. त्यांना ताकीद देऊ. नाहीतर विधिमंडळ मागासवर्गीय समितीला विनंती करू. मग ते कायद्यानुसार कारवाईला पात्र राहतील. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण व विदर्भातील काही भागात अतिवृष्टीमुळे सुमारे १७ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. गेल्या ५० वर्षात अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले हे विक्रमी नुकसान आहे. डिटेल पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे. गेल्या पाच सात वर्षांत एसडीआरएफचे निकष न बदलल्यामुळे जुन्या निकषांप्रमाणे ६,८०० प्रति एकर याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत केली जाईल. निकष बदलवण्याची मागणी केंद्राकडे केलेली आहे. 

महाज्योती ऑनलाइन परीक्षेला पुरेसा कालावधी..
महाज्योती ऑनलाइन परीक्षेला पुरेसा कालावधी आहे. दहा ऑक्टोबरपर्यंत परीक्षा होणार आहे. सगळ्यांचे मत असेल तर परीक्षा पुढे ढकलू. एकही विद्यार्थी वंचित ठेवणार नाही. याबाबत मते मतांतरे आहेत. विद्यार्थ्यांची मागणी असेल तर परीक्षा लांबणीवर टाकू, असे वडेट्टीवार म्हणाले. ऑनलाइन गेमींगमध्ये जुगार खेळण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यात अशा घटनांत वाढ झाली आहे. ‘खाली दिमाग शैतान का घर होता है’, असे म्हणतात. कोरोनामुळे सर्व ऑनलाइन सुरू आहे. त्यामुळे शाळकरी व महाविद्यालयीन मुले नैराश्यात आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रबोधन करावे लागेल. एका पिढीचे नुकसान झाले आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर ऑफलाइन शिक्षण हवे, असे वडेट्टीवार म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.