मुकुल वासनिक समर्थक यादव यांचे माजी राज्यमंत्री मुळकांवर गंभीर आरोप, राजकारण तापले...

जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी निलंबनाची जी कारवाई घडवून आणली, याची माहिती पक्षश्रेष्ठींना आहे की नाही, याची देखील माहिती मिळू शकलेली नाही. ही कारवाई करताना माझी बाजू ऐकून घेतली गेली नाही. गेल्या एक ते दीड वर्षापासून रामटेकमध्ये हे घाणेरडे राजकारण सुरू आहे.
मुकुल वासनिक समर्थक यादव यांचे माजी राज्यमंत्री मुळकांवर गंभीर आरोप, राजकारण तापले...
Wasnik - Yadav - Mulak

नागपूर : प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले State President of congress Nana patole पक्ष सोडून गेलेल्या जुन्या आणि नवीन नेत्यांची मोट बांधत आहेत. असे असताना नागपूर जिल्ह्यात मात्र कॉंग्रेस नेत्यांमधील गटबाजी अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू यादव Gajju Yadav यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक Former minister of state Rajendra Mulak यांनी षड्‍यंत्र रचून आपले निलंबन करवून घेतल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. 

या वादासाठी गज्जू यादव यांच्या निलंबनाचे निमित्त झाले. पण कॉंग्रेस नेत्यांमधील असे वाद जुनेच आहेत. गज्जू ऊर्फ उदयसिंग यादव कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी कॉंग्रेस नेते, माजी राज्यमंत्री व जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने गज्जू यादव यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली होती. तेव्हा त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी तालुक्यात काम सुरूच ठेवले. कोरोना संक्रमणाच्या काळात त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. पण आता या मतदारसंघावर राजेंद्र मुळक यांचा डोळा आहे. त्यामुळे लहानशा गोष्टीचे भांडवल करून मुळक यांनी नेत्यांवर दबाव टाकून निलंबित केल्याचा आरोप गज्जू यादव यांनी केला. 

यादव यांच्या मुळकांवरील आरोपांनंतर जिल्हा कॉंग्रेसमधील वातावरण ढवळून निघाले आहे. मुळक यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनाही आपल्याविरोधात भडकवले, असल्याचे यादव यांचे म्हणणे आहे. ज्या दुधराम सव्वालाखे यांना समोर करून निलंबित करण्याची खेळी जिल्हाध्यक्षांनी केली, त्यांच्यासोबत आपला कुठलाही वाद नाही. तर त्यांच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत काम करत आलो आहोत. पण ज्या दिवशीची घटना पुढे करून आपल्याला निलंबित करण्यात आले, त्या दिवशीही माझा सव्वालाखेंसोबत कोणताही वाद झाला नाही, तर माझ्या लहान भावाचा वाद झाला आणि त्याने दुधराम यांना झापड मारली. त्यानंतर तो वाद तेथेच निवळलाही होता. पण जिल्हाध्यक्षांनी त्याचेच भांडवल करून माझे निलंबन करवून आणले, असाही गज्जू यादव यांचा आरोप आहे. 

कसे लढणार स्वबळावर ?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून कॉंग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला तो बाळू धानोरकर यांच्या रुपाने. बाळू धानोरकरही निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आले होते. राज्यात ही परिस्थिती बदलवण्यासाठी नाना पटोले जंग जंग पछाडत आहेत आणि जिल्ह्यातील नेते आपसातील भांडणांमधूनच बाहेर पडलेले नाहीत. काही नेते ‘जुगाड’ झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपदे मिळाल्यानेच खुष आहेत. पण नाना पटोले राज्यात कॉंग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी पायाला चक्री लावून राज्यभर फिरत आहेत. अशाही स्थितीत नेत्यांनी आपसातील भांडणे मिटवून एकदिलाने काम केले नाही, तर कॉंग्रेसला गतवैभव मिळणे अवघड आहे. 

हेही वाचा : ‘बालाजी पार्टीकल’मध्ये मोठा घोळ, याचिका दाखल; खासदार गवळी अडचणीत...
 
हायकमांडकडे दाद मागणार...

जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी निलंबनाची जी कारवाई घडवून आणली, याची माहिती पक्षश्रेष्ठींना आहे की नाही, याची देखील माहिती मिळू शकलेली नाही. ही कारवाई करताना माझी बाजू ऐकून घेतली गेली नाही. गेल्या एक ते दीड वर्षापासून रामटेकमध्ये हे घाणेरडे राजकारण सुरू आहे. मी तेथे सक्रीय असेपर्यंत मुळकांना रामटेकमधून लढता येणार नाही, ही बाब लक्षात आल्यामुळे मुळकांनी षड्‍यंत्र रचल्याचाही आरोप गज्जी यादव यांनी केला आहे. 

Related Stories

No stories found.