खासदार सुजय विखे यांची गुगली... तर आपण पुन्हा एकत्र येऊ!

महापौर निवडीवरून नगरमध्ये राजकीय गुऱ्हाळ
sujay vikhe
sujay vikhe

नगर : यंदाच्या महापौर व उपमहापौर निवडीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आज (रविवारी) महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालण ढोणे यांना निरोप देण्यात आला. काँग्रेस वगळता सर्व पक्षीय नेत्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत शहराच्या विकासासाठी एकत्र आल्याचा राग आळवला. तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेळा आली, तर आपण पुन्हा एकत्र येऊ, सूचक वक्तव्य केले. त्यामुळे आगामी महापौर, उपमहापौर राष्ट्रवादीचे होणार का, अशी चर्चा सुरू आहे. (MP Sujay vikhe says we can come together again in Nagar Politics)

महापालिका सार्वत्रिक निवडणूक होऊन अडीच वर्षे उलटली आहेत. या अडीच वर्षांत शहरात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. भाजपला सत्तेत आणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळाली, तर सर्वाधिक नगरसेवक असूनही शिवसेनेला मात्र या पदापासून दूर ठेवण्यात आले. अडीच वर्षांनंतर महापौरपदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले. भाजपकडे या प्रवर्गाच उमेदवारच नाही. मात्र उपमहापौरपद खुले आहे, असे असूनही भाजप मात्र उपमहापौरपदाच्या निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवू पाहात आहे. यामागील भाजपची काही रणनीती आहे का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
ज्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला महापौरपद मिळवून दिले, त्याच शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आल्याचे सांगत असले, तरी या महाविकास आघाडीत काँग्रेस मात्र कुठे दिसत नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठिंकडूनही निवडणुकीबाबत कोणताही आदेश आज सायंकाळपर्यंत मिळाला नव्हता.

आज माऊली सभागृहात महापौर व उपमहापौर यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राजकारण हे केवळ निवडणुकांपुरतेच करायचे. त्यानंतर शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे, असे सांगितले. खासदार विखे पाटील यांनी राज्यात सत्तेसाठी पक्षांच्या भांडणे सुरू आहेत. मात्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विकासासाठी कोणतीही आघाडी तयार करायला तयार आहोत, असे वक्तव्य केले. त्यामुळे आता शहर विकासाच्या नावाखाली नगरमध्ये नवीन विकास आघाडी तयार होत असल्याची चर्चा होती.

भाजपने केली विरोधी पक्षात बसण्याची तयारी

महापालिकेतील उपमहापौरपद खुले असले, तरी भाजपने या निवडणुकीतून स्वतःला अलीप्त ठेवले आहे. त्यांनी आता विरोधी पक्षात बसण्याचे ठरविले आहे. मात्र हा विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधासारखा बोथट राहील की महापौरांवरच अंकुश ठेवणारा राहील, हे लवकरच कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com