श्रीनिवास पाटलांच्या प्रयत्नांना यश : पंजाबमध्ये अकडलेले चारशे गलाई कामगार महाराष्ट्रात परतणार

सुमारे चारशे कामगार आणि त्यांचा परिवार महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र त्यांना यात यश मिळाले नाही. त्यातील काही नागरिकांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधला.
MP Shrinivas Patil
MP Shrinivas Patil

कऱ्हाड : पंजाबच्या अमृतसर येथे महाराष्ट्रातील सोन्याचे दागिने घडविणारे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई 400 हून अधिक कारागीर परिवारासह अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत.

पंजाबमध्ये महाराष्ट्रातील डॉ. केतन पाटील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याशी समन्वय साधत खासदार पाटील यांनी त्या कुटूंबाना परत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये अडकलेल्या शेकडो गलाई कामगारांना दोन दिवसात मायभूमीत परतणार आहेत. गलाई व्यावसायिकांसाठी खासदार पाटील यांनी केलेली मदत देवदूतासारखीच ठरली आहे. 

पंजाबमधील अमृतसर आणि परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याच्या  व्यवसायात महाराष्ट्रातील शेकडो नागरिक आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे ते सारे लोकतेथेच अडकून राहिले आहेत. कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने कारागिरांना आर्थिक समस्यांशी दोन हात करावे लागत आहेत. त्याशिवाय रोजच्या अडीअडचणींशीही सामना करताना त्यांना मोठी कठीण स्थिती येत आहे. 

प्रारंभी सुमारे चारशे कामगार आणि त्यांचा परिवार महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र त्यांना यात यश मिळाले नाही. त्यातील काही नागरिकांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार खासदार पाटील यांनी पंजाब पोलिस दलात कार्यरत असलेले डॉ. केतन पाटील यांच्याशी संपर्क साधला.

सुरूवातीला एसटी बसने कामगारांच्या परतीचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. सांगलीच्या कामगारांची संख्या जादा असल्याने सांगलीचे पोलिसअधीक्षक सुहेल शर्मा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. खासदार पाटील यांनी अमृतसर व सांगलीचे आयएएस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत केंद्राकडे पाठपुरावा केला. 

मदतीची चक्रे वेगाने फिरविली. रेल्वे खात्याने संबंधित नागरिकांसाठी रेल्वेची मंजुरी दिली आहे. अमृतसर ते सांगली आणि अमृतसर ते मुंबई अशा दोन रेल्वे टप्प्याने सुटणार आहेत. त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार घरी परतणार असल्याने या कामगारांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

.पंजाबमध्ये अडकलेले गलाई व्यवसायिक येत्या तीन दिवसात मायभूमीत परततील, अशी अपेक्षा आहे. रेल्वेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे. 

- खासदार श्रीनिवास पाटील 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com