खासदार देसाईंनी चतुर्वेदींना खडसावले, तुमाने आणि जयस्वालांनाही दिल्या सूचना...

या बैठकीत शिवसैनिकांनी नागपूर शहर संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढाच खासदार देसाई यांच्यासमोर वाचला. ते शिवसेना भवनात येत नाहीत, तर घरूनच कामकाज चालवतात, ही प्रमुख तक्रार होती.
खासदार देसाईंनी चतुर्वेदींना खडसावले, तुमाने आणि जयस्वालांनाही दिल्या सूचना...
Sarkarnama

नागपूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सैनिकांमध्ये उफाळत असलेल्या असंतोषाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली. काल नागपूरकर शिवसैनिकांना मुंबईला बोलावण्यात आले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Party Chief Uddhav Thackeray त्यांना भेटले नाही. पण खासदार अनिल देसाईंनी MP Anil Desai जवळपास ३ तास सर्वांचा क्लास घेतला. आमदार दुष्यंत चतुर्वेदींना MLA Dushyant Chaturvedi खडसावण्यासोबत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने MP Krupal Tumane आणि आमदार आशिष जयस्वाल MLA Ashish Jaiswal यांनाही संघटनेपासून अलिप्त न राहण्याच्या सूचना दिल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत शिवसैनिकांनी नागपूर शहर संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढाच खासदार देसाई यांच्यासमोर वाचला. ते शिवसेना भवनात येत नाहीत, तर घरूनच कामकाज चालवतात, ही प्रमुख तक्रार होती. त्यावर शिवसेना कोणा एका नेत्याचा पक्ष नाही. त्यामुळे पक्षाचे काम एखाद्याच्या घरातून चालवले जात असेल, तर ते यापुढे चालणार नाही. सर्व बैठका व पक्षाचे इतर काम शिवसेना भवनातूनच झाले पाहिजे, अशा शब्दांत खासदार अनिल देसाई यांनी नागपूरचे आमदार चतुर्वेदींना खडसावले. 

या बैठकीला चतुर्वेदी यांच्यासह रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, सूरज गोजे, राजेश कनोजिया आदी प्रामुख्याने उपस्थित होते. माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला आहे. शहर कार्यकारिणीवरून अनेक महिन्यांपासून जुने आणि नवीन शिवसैनिकांमध्ये वाद चाललेलाच होता. माजी जिल्हाप्रमुखांना उपप्रमुख केल्याने अनेकांनी पदांचे राजीनामे दिले होते. सावरबांधे यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील नेत्यांनी नागपूरमधील घडामोडींची दखल घेत तातडीने सर्वांना मुंबईला बोलावून घेतले.

कार्यकारिणीत जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख राहिलेल्यांचे डिमोशन केले गेले. काँग्रेसमधून आयात केलेल्यांना प्रमुख केले. निष्ठावंतांना अडगळीत टाकण्यात आले. निर्णय घेताना कोणालाही विश्वासात घेतले जात नाही, शिवसेना भवनाऐवजी पक्षाचे काम घरून चालविले जाते आदी तक्रारींचा पाढाच शिवसैनिकांनी वाचून दाखवला. देसाई यांनी याबाबत संपर्क प्रमुखांना विचारणा करून खरेखोटे जाणून घेण्याचाही प्रयत्न केल्याचे समजते.

ग्रामीणप्रमाणे नागपूर शहरातही दोन जिल्हा प्रमुख नेमण्याचा प्रस्ताव या बैठकीत देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून पुढचा निर्णय कळवतो असे देसाई यांनी सांगितले. शिवसेनेत जिल्हा प्रमुख महत्त्वाचे पद समजले जाते. मात्र, नागपूरमध्ये त्याऐवजी महानगरप्रमुख आणि दोन शहर प्रमुख अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल यांनाही देसाई यांनी पक्ष संघटनेत लक्ष घालण्याचे निर्देश दिले. तुम्ही खासदार, आमदार आहात. त्यामुळे संघटनेपासून अलिप्त राहून चालणार नाही. दोघांनाही विश्वासात घेऊनच महत्त्वाचे निर्णय घेण्याचे निर्देश देसाई यांनी संपर्क प्रमुखांना दिले, असल्याची माहिती आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.