Movements to take Shekhar Gore to the Legislative Council | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

शेखर गोरेंना विधान परिषदेवर घेण्याच्या हालचाली

विशाल गुंजवटे 
शनिवार, 30 मे 2020

शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शेखर गोरे यांचे जवळचे संबंध आहेत. एक आक्रमक व्यक्तिमत्व व दुष्काळी भागातील जनतेची
टँकरच्या माध्यमातून तहान भागवणारा, स्वखर्चाने विविध विकास कामे करणारा नेता म्हणून शेखर गोरेंची राज्यभर ओळख आहे.

बिजवडी (ता. माण ) : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी रिक्त झालेल्या चार जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. यासाठी शिवसेनेमधील अनेक मातब्बर मंडळी इच्छुक असून अनेकांनी पक्ष प्रमुखांसह वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून जोरदार फिल्डींग लावली आहे. यात माण-खटावचे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्याही नावाची चर्चा आहे. माण मतदारसंघासह जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचा विधानसभेतील पराभव भरून काढला जाणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. 

 

शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शेखर गोरे यांचे जवळचे संबंध आहेत. एक आक्रमक व्यक्तिमत्व व दुष्काळी भागातील जनतेची
टँकरच्या माध्यमातून तहान भागवणारा, स्वखर्चाने विविध विकास कामे करणारा नेता म्हणून शेखर गोरेंची राज्यभर ओळख आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेखर
गोरेंनी शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा ः धक्कादायक : साताऱ्यात कोरोनाची 500 कडे वाटचाल

त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून माण विधानसभा मतदारसंघासाठी शेखर गोरेंची उमेदवारी जाहीर केली होती. राज्यात शिवसेना- भाजपा युती झाल्यानंतर माण विधानसभा मतदारसंघ भाजपकडे गेला. तरीही पक्ष प्रमुखांनी शेखर गोरेंना दिलेला शब्द माघारी घेतला नाही. शेखर गोरेंचे कार्य पाहून त्यांना शिवसेनेचीच उमेदवारी देत दिलेला शब्द खरा करून दाखवला.

आवश्य वाचा : पृथ्वीराज चव्हाणांच्या नो कॉमेंटस्‌ मागे दडलय काय

खराब हवामानामुळे पहिल्या दिवसाची सभा रद्द झाल्यानंतर मोबाईलवरून जनतेशी संवाद साधत मी तुमच्या भेटीला उद्या येतोय म्हणत पुन्हा दुसऱ्या दिवशी उध्दव
ठाकरेंच्या उपस्थितीत रेकॉर्डब्रेक सभा झाली. मात्र, या निवडणूकीत शेखर गोरेंना पराभवाचा सामना करावा लागला. जनतेसाठी एवढ्या तळमळीने स्वखर्चातून काम
करणाऱ्या नेत्याला पराभव सहन करावा लागला.

हेही वाचा ः नगरमध्ये आता भाजप - राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांत जुंपणार

हा पराभव शेखर गोरेंबरोबरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्याही जिव्हारी लागला. तरीही हताश न होता शेखर गोरेंनी पक्षसंघटना मजबूत करत माण पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवला. ज्याप्रमाणे शेखर गोरेंनी माण मतदारसंघात विरोधकांना थोपवत जिथे असेल तिथे प्रामाणिकपणे काम करत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. तेच काम त्यांनी जिल्ह्यात करून दाखवत शिवसेना पक्ष मजबूत करावा. या आक्रमक नेत्याला बळ देत विधान परिषदेवर घेण्याच्या हालचाली शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत.

 

मुख्यमंत्र्यांचे व शेखर गोरेंचे जिव्हाळ्याचे संबंध....

शेखर गोरेंनी स्वखर्चातून विकासकामे करत राज्यभर आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. याच त्यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी
त्यांचे कौतुक केले होते. त्यानंतर या दोघांच्यात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. जिल्ह्यात शिवसेनेला पक्षवाढीसाठी आक्रमक नेत्याची गरज असून शेखर गोरेंच्या
माध्यमातून त्यांच्याकडे चेहरा आहे. त्यामुळे त्यांना ताकद देत विधान परिषदेवर घेतले जाऊ शकते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख