`राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या रेट्यामुळे सरकारन मंदिरे उघडली` - mns workers claim due to raj thaceray govt decides to open temples | Politics Marathi News - Sarkarnama

`राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या रेट्यामुळे सरकारन मंदिरे उघडली`

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

मंदिरे उघडण्याच्या निर्णयावर श्रेयवाद सुरू...

सोलापूर : दिवाळी पाडव्यापासून मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्यामुळे भक्‍त आंनदोत्सव साजरा करता असतानाच या निर्णयावरून आता राजकीय श्रेयवाद सुरु झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात पेढे वाटप करीत फटाके फोडले. यावेळी प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात मोठे आंदोलन पार पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या प्रयत्नातूनच मंदिरे उघडली म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्यापासून मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार राज्यातील सर्व मंदिरे, मस्जिद यासह अन्य धार्मिक स्थळे उघडली जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर मंदिर परिसरात व पंढरपुरात आंदोलन केले होते. प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीला यश मिळाले म्हणून वंचित बहूजन आघाडीने श्री सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात आंनदोत्सव साजरा केला. यावेळी प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम, शहराध्यक्ष गणेश पुजारी, कोषाध्यक्ष बबन शिंदे, महाराष्ट्र राज्य महिला सदस्या अंजनाताई गायकवाड, रवी थोरात, शिवाजी बनसोडे, सुहास सावंत, भिमा मस्के, करण वाढवे, बाबा गायकवाड, सुरज मस्के, सुजाता वाघमारे आदी उपस्थित होते.

राज साहेबांमुळेच उघडले मंदिरांचे टाळे
दोन दिवसांत मंदिरे सुरु होतील, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिली होती. राज्यातील संतांचे वंशज, महाराज कृष्णकुंजवर भेट घेतली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे श्रेय आपल्या नेत्याला दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख