आमदार नवघरे यांच्यामुळेच पक्ष सोडला; पदाधिकाऱ्यांनी डागली तोफ..

राष्ट्रवादीचे दोन माजी सभापती व काही गावातील सरपंचासह सात ते आठ जणांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला होता.
आमदार नवघरे यांच्यामुळेच पक्ष सोडला; पदाधिकाऱ्यांनी डागली तोफ..
Ncp Activites Join Shivsena-Mla Raju Navghare News Vasmat-Hingoli

वसमत ः गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काॅंग्रेस सोबत असलेल्या तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत या सगळ्यांनी शिवबंधन बांधून घेतले. राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे तालुक्यातील कुठल्याच निर्णय प्रक्रियेत आम्हाला विश्वासात घेत नव्हते, एवढेच काय पण पक्षाच्या कार्यक्रमांचे निमंत्रण देखील दिले जात नव्हते. (MLA Navghare left the party; office bearers blame) दोन वर्ष आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत होतो, वाट पाहत होतो, पण परिस्थिती बदलली नाही, म्हणून आम्हाला राष्ट्रवादी पक्ष सोडावा लागला, असा दावा शिवसेनेत दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

राष्ट्रवादीचे दोन माजी सभापती व काही गावातील सरपंचासह सात ते आठ जणांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला होता. (Shivsena Vasmat Taluka) गेल्या काही महिन्यांपासून वसमतचे आमदार राजू नवघरे व पक्ष सोडलेल्या पदाधिकाऱ्यांमधील संबंध ताणले गेले होते. नवघरे हे तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचा कारभार एकहाती सांभाळत होते. पक्षाचे सगळे निर्णय हे ते स्वतः घेत असले तरी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, असे त्यांना कधीच वाटले नाही.

मर्जीतल्या लोकाना सांभाळायचे आणि वर्षनुवर्ष कुठलीही अपेक्षा न ठेवता राबणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मात्र डावलायचे असे त्यांचे धोरण राहिले आहे. (Ncp Mla Raju Navghare Vamat) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांचा नुकताच तालुक्यात संवाद दौरा झाला. पण या दौऱ्याचे साधे आमंत्रण देखील आम्हाला देण्यात आले नव्हते.

आम्ही दोन वर्षे पक्षासाठी थांबलो परंतु पक्षात आमची घुसमट काही केल्या थांबत नव्हती. त्यामुळे पुढचा पर्याय म्हणून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला व प्रवेश केल्याचे राष्ट्रवादीचे माजी कृषि सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्याने केला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे दोन माजी सभापती, सरपंच व राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. राजू चापके यांची वसमत तालुकाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर तालुक्यात पक्षाला बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राष्ट्रवादीतील नाराज गटावर त्यांचा डोळा होता.

आमदार राजू नवघरे यांच्याकडून डावलले जात असल्याची भावना असलेले जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे ,तसेच वसमत बाजार समितीचे सभापती राजेश इंगोले , राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान सरपंच देविदास पाटील कऱ्हाळे, सती पांगरा येथील सरपंच श्याम कदम ,टोकाईचे संचालक शंकरभाई कऱ्हाळे, गिरगावचे माजी सरपंच कल्याण पाटील कऱ्हाळे , नाहदचे सरपंच भगवान कावळे, रोडगा- फाटा येथील सरपंच बद्रीनाथ कदम हे मागील काही दिवसापासून पक्ष बदलाच्या तयारीत होते.

शिवसेनेचा पर्याय स्वीकारला..

समर्थकांच्या बैठका घेऊन त्यांनी चाचपणी देखील सुरू केली होती. तेव्हा अनेकांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे मत व्यक्त केले होते.  शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, खासदार हेमंत पाटील ,जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर, तालुका प्रमुख राजू चापके यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी शनिवारी मुंबई येथे मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

पक्षात घुसमट, स्थानिक आमदाराकडून डावलले जाणे, निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेणे, व पक्षाच्या कार्यक्रम व नेत्यांपासून रोखण्याचा सातत्याने होत असलेला प्रयत्न यामुळे आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असेही या सर्वांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.