आमदार गोरेंच्या रूग्णालयाची होणार तपासणी.... 

जुलै २०२१ मध्ये टी.पी.ए. (थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर) मार्फत केलेल्या चौकशीमध्ये एबीजी रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तीन ऑगस्ट २०२१ पासून जनआरोग्य योजनेच्या अंगीकृत समन्वय व शिस्तपालन समितीमार्फत रुग्णालय निलंबित करण्यात आले.
आमदार गोरेंच्या रूग्णालयाची होणार तपासणी.... 
MLA Gore's hospital to be inspected ....

मायणी : अनेक तक्रारींच्या फेऱ्यात अडकलेल्या आमदार जयकुमार गोरेंच्या संबंधित इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर या मेडिकल कॉलेज संलग्नित रुग्णालयाची तपासणी करण्यासाठी उद्या त्रिसदस्यीय विशेष पथक येथे दाखल होणार आहे. 

याबाबतची माहिती अशी, मेडिकल कॉलेजशी संलग्नित रुग्णालयात चालवलेल्या कोविड सेंटरमधील (डीसीएचसी) उपचार व बिलांबाबत रुग्णांच्या नातेवाईकांसह नागरिक व काही सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी, आरोग्यमंत्री आदींकडे तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी काही लेखी तक्रारींची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले होते. 

त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्या (मंगळवार ) त्रिसदस्यीय समिती मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. पुणे मंडलाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजीव कदम यांचे तसे लेखी पत्र येथील रुग्णालय व्यवस्थापनाला प्राप्त झाले आहे. त्या पत्रातील मजकूर असा, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर मायणी हे रुग्णालय २३ एप्रिल २०२० रोजी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात आले आहे.
 
आवश्य वाचा : अफगाणिस्तानातून पळालेल्या अध्यक्षांना कुणी देईना थारा!

जुलै २०२१ मध्ये टी.पी.ए. (थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर) मार्फत केलेल्या चौकशीमध्ये एबीजी रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तीन ऑगस्ट २०२१ पासून जनआरोग्य योजनेच्या अंगीकृत समन्वय व शिस्तपालन समितीमार्फत रुग्णालय निलंबित करण्यात आले. रुग्णालयाच्या पुढील दाव्यांची अदायगी स्थगित करण्यात आली. आता विशेष पथकामार्फत रुग्णालयाची चौकशी करण्यात येणार आहे.

 त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ, पुणे आहेत. तर सहायक संचालक (वैद्यकीय) उपसंचालक कार्यालय, पुणे आणि डॉ. अमोल मस्के विभागीय व्यवस्थापक, पुणे (सदस्य सचिव) असे दोन सदस्य आहेत.  

Related Stories

No stories found.