जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्र्यांनी केली सांगली-सातारा हद्दीवरील चेकपोस्टची पाहणी 

पोलिसांची नाकाबंदी चांगल्या पध्दतीने सुरु आहे. आता प्रवास करणे टाळले पाहिजे. फारच गरज असेल तर परवानगी घेऊन प्रवास करावा. पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. जनतेचा संपर्क आल्यामुळे पोलिस बाधीत होत आहेत. त्यांच्या प्रकृतीची काळजी जनतेने घेतली पाहिजे.
जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्र्यांनी केली सांगली-सातारा हद्दीवरील चेकपोस्टची पाहणी 
Minister of State for Home Affairs inspected the check post at Sangli-Satara border

कऱ्हाड : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात आज गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरील मालखेड चेकपोस्टला भेट देवुन पाहणी केली. जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, अशाही सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

मालखेड चेकपोस्टवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी मंत्री देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरीलही चेकपोस्टची पाहणी केली. यावेळी श्री. देसाई म्हणाले, राज्यात जिल्ह्याच्या नाकाबंदीची पोलिस खात्याची तयारी पूर्ण झाली आहे.

काल (गुरूवारी) रात्री आठ वाजल्यापासून पोलिस दल अलर्ट आहे. राज्यात जिल्हा वाहतुकीची बंदी लागु करण्यात असल्याने वैद्यकीय, दुःखद घटनेचे किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्याची हद्द सोडता येणार नाही. पोलिसांची नाकाबंदी चांगल्या पध्दतीने सुरु आहे. आता प्रवास करणे टाळले पाहिजे. फारच गरज असेल तर परवानगी घेऊन प्रवास करावा. पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. जनतेचा संपर्क आल्यामुळे पोलिस बाधीत होत आहेत. त्यांच्या प्रकृतीची काळजी जनतेने घेतली पाहिजे. 

शेणोली, मालखेडच्या सीमाबंद... 

सातारा व सांगली जिल्ह्याच्या मालखेड, शेणोली, सोनसळ घाट येथे सीमा पोलिसांनी काल रात्री सील केल्या. जिल्हाबंदीच्या कारवाईपोटी मालखेड, शेणोली व सोनसळ घाट येथे कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यातंर्गत चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे व मुंबईवरून येणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. 

Related Stories

No stories found.