गृहराज्यमंत्र्यांमुळे कोयना पर्यटन विकासाला भरारी; मिळाला ७१ लाखांचा निधी 

कोयना धरणाच्या १० किमी परिसरात असणारे प्रेक्षणीय ठिकाणे विकसित करुन येथील पर्यटनाला पर्यटन पंढरी बनविण्यासाठी कोयना पर्यटनाचा आराखडा तयार केला आहे.
गृहराज्यमंत्र्यांमुळे कोयना पर्यटन विकासाला भरारी; मिळाला ७१ लाखांचा निधी 
Minister Shambhuraj Desai boosts Koyna tourism development; Received a fund of Rs. 71 lakhs

कोयनानगर : गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे कोमेजून गेलेला कोयना परिसर पर्यटकांनी गजबजू लागला आहे. राज्य शासनाकडुन कोयना विभागात पोलिस प्रशिक्षण उपकेंद्र व राज्य आपत्ती बचाव दल पथक या बहुउद्देशीय प्रकल्पाबरोबर कोयना पर्यटनाच्या विकासासाठी ७१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लवासा सिटीप्रमाणे कोयनानगरचा विकास करून हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून उदयास आणण्याचे काम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून होत असून पर्यटन क्षेत्रात भरारी घेण्यासाठी कोयना पर्यटन सज्ज झाला आहे. Minister Shambhuraj Desai boosts Koyna tourism development; Received a fund of Rs. 71 lakhs

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर व पर्यटकांसाठी विकेंड डेस्टिनेशन असणारे कोयनानगर पश्चिम घाटाच्या सुंदर अशा सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसले आहे. कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प, नयनरम्य नेहरु स्मृती उद्यान, ओझर्डे धबधबा कोयना अभयारण्य  ही पर्यटकांची आकर्षण आहेत.समृद्ध जंगलाचे प्रतिक असणाऱ्या कोयनेच्या घनदाट जंगलाची भुरळ सर्वांना आहे.त्यामूळेच हे जंगल यूनोस्कोच्या जागतिक नेटवर्क ऑफ बायो स्फिअर रिझर्व्हर चा मोठा भाग बनले आहे.

कोयना धरणच्या १० किमी परिसरात असणारे प्रेक्षणीय ठिकाणे विकसीत करुन कोयना पर्यटनाला पर्यटन पंढरी बनविण्यासाठी कोयना पर्यटनाचा आराखडा तयार केला आहे. कोयना पर्यटनाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा देवुन त्या माध्यमातून २८ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. सध्या कोयना पर्यटनाच्या विकासासाठी ७१ लाख रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. या माध्यमातून कोयनानगर येथे 3 डी कारंजा, नेहरू उद्यान सुशोभीकरण हिरकणी कक्ष व पर्यटन अनुषंगाने विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in