मंत्री गडाखांनी फोन केला अन खत टंचाईचा प्रश्न सुटला

गडाख यांनी बुधवारी आर.सी.एफ., नर्मदा व जी.एस.एफ.सी या प्रमुख खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सविस्तर चर्चा केली.
Shankarrao gadakh.jpg
Shankarrao gadakh.jpg

नेवासे : जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी बुधवारी आर.सी.एफ., नर्मदा व जी.एस.एफ.सी  या प्रमुख  खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी ७ हजार ५०० मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. (Minister Gadakh called and the issue of fertilizer shortage was resolved)

नेवासे तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, मका, सोयाबीन व ऊस पिकासह इतर पिकांसाठी गरजेनुसार युरिया खत उपलब्ध व्हावे म्हणून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी बुधवारी (ता. १६) नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून चर्चा केली.

नेवासे तालुक्यास पुरवठा करण्यात आलेल्या एकूण खतामधून 691 मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक केलेला आहे. त्यातील 70 टक्के म्हणजे 483.70  मेट्रिक टन युरीया खत शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकासाठी असलेली मागणी विचारात घेऊन तालुक्यातील परवानाधारक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली होती. नेवासे तालुक्यासाठी 483.70 मेट्रिक टन युरिया खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हे खत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावाजवळील अधीकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रामधून घेऊन जावे, असे आवाहनही मंत्री गडाख यांनी केले आहे.

कृषिमंत्री दादा भुसे  व मंत्री गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासे तालुक्यासाठी आत्तापर्यंत पुरवठा झालेल्या 2076 मेट्रिक टन युरिया खतापैकी तालुक्यात युरीया खताची मोठी टंचाई असतांना मुळा बाजार मार्फत सोनई व नेवासे येथून 130 मेट्रिक टन युरीया खताची 939 शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली.

मुळा बाजारमार्फत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युरीया खत मिळावे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यास तीन गोण्या खत आधार कार्ड लिंक करून व प्रति गोणी 266 रुपये दराप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात आले.

आता खताचे बफर स्टॉकमधून मंत्री गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांना 483.70 मे. टन युरीया अधिकृत परवानाधारक खत दुकानदारामार्फत उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, महाराष्ट्रभर खतांची टंचाई होऊ नये, यासाठी गडाख प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in