महाराष्ट्राने एक कोटी नागरिकांना दोन्ही डोस दिले, पण अद्यापही दोन कोटी नागरिक लसीपासून वंचितच..

राज्यातील ज्या जिल्हयामध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे, त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करत आहे.
महाराष्ट्राने एक कोटी नागरिकांना दोन्ही डोस दिले, पण अद्यापही दोन कोटी नागरिक लसीपासून वंचितच..
Maharashtra Vaccine News Mumbai

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. मात्र अद्यापही राज्यातील साधारण २ कोटींपेक्षा अधिक जणांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही.  (Maharashtra gave both doses to one crore citizens, but still two crore citizens are deprived of vaccines) राज्यातील ६ कोटी जनतेसाठी १२ कोटी लसींच्या डोसची आवश्यकता आहे.

दिवसाला दहा ते पंधरा लाख लसीचे डोस देण्याची राज्याची क्षमता आहे. मात्र लसीचा पुरवठा धिम्या गतीने होत असल्याने राज्यात अनेक लसींचे केंद्र बंद आहेत. (Corona Vaccinesion in Maharashtra) पण राज्याला प्राप्त झालेली लस कमीत कमी वाया घालवून गतीने त्याचे वितरण होत असल्याने देशात लसीचे दोन्ही डोस १ कोटी जनतेला देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.

राज्यात आज दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील 

राज्यातील ज्या जिल्हयामध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे, त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करत आहे.  हा अहवाल दोन दिवसांनी आल्यानंतर निर्बंध कमी करायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे आरोग्यमंंत्री  राजेश टोपे यांनी सांगितले.

सध्या राज्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून राज्यात पूर्ण क्षमेतेने लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे मात्र केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्यानं लसीकरण करण्यात अडथळा येत आहे.लसींचा केंद्राकडून चांगल्या प्रमाणात पुरवठा झाल्यास राज्यात ७० ते ८० टक्के लसीकरण पूर्ण होऊन निर्बंध कमी करण्यास मदत होईल.

पूरग्रस्त जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या टीम पाठवण्यात आल्या असून साथीचे आजार पसरू नये म्हणून प्रतिबंधक उपाय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  खाजगी हॉस्पिटलमध्ये सीरियस रूग्णांसाठी ५० टक्के खाटा राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही टोपे यांनी दिली.  फ्रंट लाईन वर्करमध्ये ३५ टक्के लसीकरण झालं असून फ्रंट लाईन वर्कर्सनी सर्वात अगोदर लसीकरण करून घ्यावं जेणेकरून तिसऱ्या लाटेत या कर्मचाऱ्यांना आणखी काम करता येईल.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.