साताऱ्यात लॉकडाऊन शिथिल; काय आहेत नियम पहा

सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. दुकामानध्ये प्रत्येक ग्राहकांत किमान सहा फुट अंतर राहिल याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई आहे.
Lockdown Relax In Satara District
Lockdown Relax In Satara District

सातारा : सातारा जिल्ह्याचा नॉन रेड झोनमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उद्या (शुक्रवार)पासून सर्व दुकाने वेळेचे बंधन पाळून व सुरक्षेच्या उपाय योजना करून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नेमके काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची माहिती अशी आहे. 

हे सुरू होणार...
उद्या(शुक्रवार) पासून सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी आहे. प्रतिबंधित नसलेल्या कृती करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. क्रीडांगण, स्टेडीयम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समुह विरहीत, सामाजिक अंतर ठेऊन शारिरिक व्यायाम व इतर क्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी राहिल. यामध्ये दुचाकी वाहनावर एक चालक, तीनचाकीवर 1+2 व्यक्ती, चार चाकी वाहनात 1+ 2 व्यक्तींना परवानगी असेल. सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व मार्केट व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत चालू राहतील. जर गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील. त्यविधी व लग्न समारंभ कर्यक्रमात 50 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी राहिल. तथापि लोकांची गर्दी होऊ नये म्हणून संयोजकांनी काळजी घेणे गरजेचे राहील. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. दुकामानध्ये प्रत्येक ग्राहकांत किमान सहा फुट अंतर राहिल याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास पाचशे रूपये दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास एक हजार रूपये दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

हे बंद राहणार.....
 सातारा जिल्ह्यातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. वय वर्षे 65 वर्षावरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच राहावे. त्यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध राहिल. सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिटयूट या बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा व इतर हॉस्पिटीलिटी सेवा बंद राहतील. फक्त या सेवा आरोग्य, पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विषयक काम करणारे कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेले पर्यटक, कामगार व क्वारंटाईन सुविधा चालविणाऱ्या यांच्यासाठी चालू राहतील. तथापि रेस्टॉरंट यांना त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थ तयार करुन घरपोच सेवा देता येतील. सर्व चित्रपट गृहे, शॉपिंग मॉल, जिम, स्विमींग पुल, एंटरटेंमेंट पार्क, बार्स ॲन्ड ऑडिटोरियम, असेंम्बली हॉल, मंगल कार्यालय हे सर्व बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे बंद राहतील.

अशी होणार कारवाई....

 सार्वजनिक  ठिकाणी, घराबाहेर व  घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर पाचशे रूपये दंड आकारण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, थुंकल्यास एक हजार रूपये दंड आकारण्यात येईल. जिल्ह्यात सार्वजनिक लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनांमध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास एक हजार रूपये, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दोन हजार रूपये दंड आकारण्यात येईल व शहरी भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाची आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com