36 लाख शेतकऱ्यांची आकडेवारी दोन दिवसांत -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काही नवीन गणितज्ञ !!सरकारकडे सर्व शेतक-यांचा रेकॉर्ड आहे. सर्व आकडेवारी स्पष्ट आहे. सरकारमध्ये कोणत्याही गोष्टी लपवून ठेवता येत नाहीत. सध्या आकडेमोड मोठया प्रमाणात चालली आहे. काही नवीन गणितज्ञ तयार झाले आहेत, असा टोलाही मुख्यमंत्रयांनी यावेळी लगावला.
devendra-phadanvis-2.jpg
devendra-phadanvis-2.jpg

मुंबई : ज्या शेतक-यांकडे दीड लाख रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी आहे.त्यांनी उर्वरित रक्‍कम भरावी.त्यानंतर सरकार दीड लाख रूपयांची रक्‍कम कर्जखात्यात जमा करणार असून, हे शेतक-यांच्याच हिताचे आहे. कारण बॅंक आधी कर्जावरील व्याजाची रक्‍कम वसूल करते.सरकारने आधी पैसे भरले तर व्याजातच जातील व शेतकरी कर्जबाजारीच राहतील. असे स्पष्ट करत येत्या दोन दिवसांत पहिल्या 36 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाईल. अशी माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ही आकडेवारी जिल्हानिहाय असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.कर्जमाफीची जी आकडेवारी जाहीर झाली आहे, ती योग्यच असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, 36 लाख शेतक-यांची आकडेवारी तयार आहे. त्याबाबत सरकार दोन दिवसांत जाहीरपणे ही यादी प्रसिध्द करणार आहे. 

शेतकरी कर्जमाफीचा बोजा सरकारने स्वीकारला आहे. त्यासाठी कुठून तरी पैसा उभा करावा लागेल.काही प्रमाणात विकासकामांवरही परिणाम होईल. त्यासाठी अनावश्‍यक खर्च कमी करावा लागेल. काही कामे लांबणीवर टाकावी लागतील. पैसे उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही नवीन मार्ग शोधून पैसे उभारण्यात येतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दरम्यान, दिड लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित कर्जाची रक्‍कम भरण्याची मुदत उद्‌या (ता.30) ला संपणार आहे. त्यामुळे, शेतकरी हवालदिल झाले असून यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com