श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या झीजेमुळे 'पंचामृत' वापरावर मर्यादा; गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढले जाणार

भाविकांच्या श्वसनाने ह्युमीडिटी वाढत असल्याने गरम हवा बाहेर जाण्यासाठी अजून प्रयत्न करण्याबाबतची सुचना करण्यात आली आहे.
 Sri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest News
Sri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest NewsSarkarnama

पंढरपूर : श्री क्षेत्र पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल-रुक्मिणी (Sri Vitthal-Rukmini Temple) मूर्तीच्या झीज प्रकरणी पुरातत्व विभागाचा अहवाल आला आहे. यानुसार आज (ता.12 मे) मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच, पूजेवेळी दूध, दही, मध साखर वापरावरही मर्यादा आली असून परातत्व विभागाच्या सुचनेच पालन केले जाणार असून शासनाच्या नियमानुसारच मुर्तीला वज्रलेप करावा लागेल, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) यांनी दिली आहे. (Sri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest News)

 Sri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest News
'श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज थांबवण्यासाठी उपाययोजनाचे तातडीने निर्देश'

मंदिर समितीची पंढरपुरात आज बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.आषाढी एकादशी सोहळ्याच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देणार येणार असून आषाढी एकादशी पूर्वी रुक्मिणी मूर्तीच्या चरणावर वज्रलेप केला जाणार आहे. येत्या १० जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. तसेच भारतीय पुरातत्व विभागाने मूर्ती पाहणी अहवाल दिला असुन त्यानुसार लवकरच श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया केली जाणार आहे. मूर्ती संवर्धनासाठी विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढले जातील आणि शक्य झाल्यास आषाढी वारी पूर्वीच ही सर्व कामे समिती करणार आल्याचेही औसेकर महाराजांनी सांगितले.

विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज होत असल्याने यापुढे आता पूजेवेळी दूध, दही, मध साखर वापरावर मर्यादा आली असून क्षार मुक्त पाण्याचा वापर होणार आहे. गाभारा आणि चौखांबीमध्ये भाविकांच्या श्वसनाने ह्युमीडिटी वाढत असल्याने गरम हवा बाहेर जाण्यासाठी अजून प्रयत्न करण्याबाबतची सुचना करण्यात आली आहे. याबरोबरच रुक्मिणी मुर्तीच्या पायाबाबत का माहिती दिली नाही, याबाबतची चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे.

 Sri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest News
फडणवीसांनी घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन; पाहा फोटो

दरम्यान, चार दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा आणि त्यांच्या पथकाने मूर्तींच्या होत असलेल्या झीजेची पाहणी केली होती. यावेळी विठ्ठल मूर्तीची नेमकी कोणत्या भागात झीज होतेय याबाबतची पाहाणी केली. तसेच, रुक्मिणी मूर्तीच्या पायाला पडलेल्या खड्ड्याचेही निरिक्षणही केली. यावेळी गाभाऱ्यातील फर्ची काढण्याच्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

याचबरोबर विठ्ठल-रुक्मिणीचे लाखों भाविक चरणस्पर्श करून दर्शन घेतात यामुळेही चरणांची झीज होते. असेही निरिक्षण केले. मात्र, हा धार्मिक विषय असल्याने त्या संदर्भातील निर्णय मंदिर समितीने घ्यावा, अशी सुचना करण्यात आली. गाभाऱ्यात केली जाणारी विविध फुलांची आरास आणि पूजे दरम्यान वापरले जाणारे पंचामृत यासंदर्भात मंदिर समितीला काही सूचना करण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com