गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ तातडीने कार्यन्वित करा

अर्थसंकल्पातील तरतुदी प्रमाणे महामंडळासाठी निधी उभा करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असून, ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे कायदा लागू करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. विभागाचे अधिकारी यांच्यासह, साखर कारखाना प्रतिनिधी, प्रत्यक्ष ऊसतोड कामगार, मुकादम व विविध संघटना यांचे प्रतिनिधी यांना महामंडळ व घटना समितीमध्ये स्थान द्यावे, महामंडळ स्थापनेमध्ये त्यांना विश्वासात घ्यावे अशा सूचनाही मुंडें यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
minister dhnanjay munde meeting news mumbai
minister dhnanjay munde meeting news mumbai

मुंबई : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना, घटना इत्यादी आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करा, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. प्राथमिक स्तरावर ऊसतोड कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची प्रक्रिया येत्या काही दिवसातच सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे लवकरच ऊसतोड कामगार कल्याण मंडळ सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंबंधीची महत्वपूर्ण बैठक मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर आज पार पडली. आमदार संजय दौंड, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टी चे महासंचालक धम्मजित गजभिये, ग्रामविकास विभागाचे उपसचिव जोशी, कामगार विभागाचे उपसचिव, सहकार विभागाचे उपसचिव घाडगे, साखर आयुक्तालयाचे संचालक उत्तम इंदलकर यांच्या उपस्थित अनेक निर्णय घेण्यात आले.

उसतोडणीचा हंगाम येत्या काही दिवसात सुरू होत असून, कामगारांची शासनाकडे नोंद करून त्यांना ओळखपत्र देणे, आरोग्य तपासणी करणे तसेच ऊसतोड कामगार व त्यांच्या पशूंना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट साध्य करण्यासंबंधी या बैठकीत चर्चा झाली. महामंडळाच्या माध्यमातून 'कंपनी कायद्याच्या' अंतर्गत ऊसतोड मजुरांची नोंदणी १५ दिवसात करण्याचे निर्देशही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले.
महामंडळाची रचना कशी असावी, घटना, आकृतीबंध तयार करणे, महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, महामंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी या सर्वच विषयांवर बैठकीत चर्चा झाली. उसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी व त्यांच्या कौटुंबिक सुरक्षेसाठी महामंडळाच्या माध्यमातून काही कल्याणकारी योजना राबविण्याचा आपला मानस असून यासाठी त्याद्वारे निधी उभा करण्यासाठी सहकार विभागासोबत चर्चा सुरू असल्याचे मुंडे यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पातील तरतुदी प्रमाणे महामंडळासाठी निधी उभा करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असून, ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे कायदा लागू करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. विभागाचे अधिकारी यांच्यासह, साखर कारखाना प्रतिनिधी, प्रत्यक्ष ऊसतोड कामगार, मुकादम व विविध संघटना यांचे प्रतिनिधी यांना महामंडळ व घटना समितीमध्ये स्थान द्यावे, महामंडळ स्थापनेमध्ये त्यांना विश्वासात घ्यावे अशा सूचनाही मुंडें यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ज्या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांची संख्या सर्वाधिक आहे, असे पाच तालुके निवडून तेथे ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी स्वतंत्र पाच निवासी शाळा उभारण्यात येणार आहेत.  या माध्यमातून मुलींना मोफत शिक्षण व सामाजिक सुरक्षा उपलब्ध करू देण्यासाठी निधी व अन्य बाबी उभ्या करण्याची जबाबदारी मी  स्वतःकडे घेतली असल्याचेही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com