गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग, आयसीयूमध्ये उपचार सुरू

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग, आयसीयूमध्ये उपचार सुरू
Lata mangeshkarSarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Covid-19) संक्रमण झपाट्याने वाढत असल्याने देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये अनेक राजकीय नेते मंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता या यादीत दिग्गज गायिका अललेल्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.

Lata mangeshkar
ओमिक्रॉनला छोटा कोरोना म्हणणारे मेक्सिकोचे अध्यक्ष 24 तासांतच पॉझिटिव्ह

लता मंगेशकर यांना कोरोनाबरोबरच न्यूमोनियाचाही त्रास असल्याने खबरदारी म्हणून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 92 वर्षीय लता दीदींना याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळीही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता.

Lata mangeshkar
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा जगाला आठवडाभरात दुसरा धक्का

गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांना लवकर आराम वाटावा, अशी मी प्रार्थना करतो, अशी प्रार्थना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीटमाध्यमातून केली आहे. तसेच, अनेक चाहत्याकडून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. लतादीदी या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या अनेकदा चाहत्यांसाठी जुने फोटो आणि मनोरंजक किस्से शेअर करताना दिसतात. दरम्यान, आजघडीला अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कालच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in