लाव रे तो व्हिडीओ : क्षीरसागर काकांनी दाखविला, आता पुतण्याची बारी

शहरात व मतदार संघात गुंडगिरी, माफियागीरी, वाळू माफिया, गुटखा व मटका कसे वाढले आहेत. त्याला आमदार संदीप क्षीरसागरांचा वरदहस्त कसा आहे याकडे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी अंगुलीनिर्देश केला.
Ncp Mla Sandip Kshirsagr-Dr.Bharatbhushan Kshirsagar Beed News Politics
Ncp Mla Sandip Kshirsagr-Dr.Bharatbhushan Kshirsagar Beed News Politics

बीड : राज्याच्या राजकारणातले जेष्ठ पुतणे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ने राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा घडविली. त्यानंतर जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची `सीडी`, अद्याप लागली नसली तरी चर्चेत आहे.(Laav re to video: Uncle Kshirsagar showed, now it's Nephew's turn) आता बीडच्या राजकारणातही ‘व्हिडीओ गेम’सुरु झाला आहे.

काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ‘लावरे रे तो व्हिडीओ’म्हणत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला. (Ncp Mla Sandip Kshirsagar Beed) आता पुतणे कोणता व्हिडीओ दाखविणार याकडे बीडकरांचे लक्ष आहे.

काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर बीडकरांसाठी नवे नाही. (Dr.Bharatbhushan Kshirsagar, Beed) आरोप - प्रत्यारोपासह कार्यकर्त्यांचे पत्रकावॉर बारमाही सुरु असते. आता नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरेाप केला.

तसेच पदाचा दुरुपयोग करत शहरातील विकास कामे जाणीवपूर्वक अडविल्याचाही आरोप केला. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या अखत्यारितील कामांचे अपयश पुढे करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत बीड मतदार संघातील रस्त्यांची दुरावस्था दाखविणारा व्हिडीओ लावला.

संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही संदीप क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल करताना ‘आमदार नेहमी मंत्र्यांसमोर वाकून उभे असतात’पण विकास कामांना निधी का आणत नाहीत, निधी आणत असतील तर कामे कुठे? असा खोचक सवालही उपस्थित केला आहे.

तर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मतदार संघात व शहरात माफियागिरी, गुंडगिरी, वाळूमाफिया, मटका व गुटखा वाढण्याला स्थानिक आमदारांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप केला. आता संदीप क्षीरसागर याला कसे उत्तर देणार हे पहावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com