कोल्हापूर, सांगलीची पूरपरिस्थिती बिकट झाल्याने  चिंचवडचा दौरा आटोपता घेत पाटील कोल्हापूरकडे...

सर्व ठिकाणी सर्व मदत सुरु असून एनडीआऱएफच नाही, तर लष्कर आणि नौदलाचीही मदत पूरग्रस्त भागातील बचाव कार्यासाठी घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर, सांगलीची पूरपरिस्थिती बिकट झाल्याने  चिंचवडचा दौरा आटोपता घेत पाटील कोल्हापूरकडे...
Kolhapur, Sangli flood situation is dire

पिंपरी : अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीमुळे मदतकार्यात अडथळा येतो, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लगेचच पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर गेले नाहीत. मात्र, ते मुंबईतील नियंत्रण कक्षातून राज्यातील पुरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असा मुख्यमंत्र्यांचा बचाव राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज (ता.१३) पिंपरी चिंचवडमध्ये केला. यावरून भाजपने मविआ सरकार व त्यातही मुख्यमंत्र्यांना अगोदरच लक्ष्य करण्यास सुरवात केल्याने जलसंपदामंत्री त्यांच्या मदतीला धावून गेले. Kolhapur, Sangli flood situation is dire

दरम्यान, कोल्हापूर, सांगलीची पूरस्थिती बिकट झाल्याचे समजताच पिंपरी-चिंचवड दौरा आटोपता घेत ते तातडीने कोल्हापूरला रवाना झाले. मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाची व त्यातही कोल्हापूर, सांगली, सातारा व रायगड जिल्ह्याची पाहणी करतील, असे पाटील यांनी सांगितले. श्रमिक आणि कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या व कोरोना काळात त्यांना मोठा मदतीचा हात दिलेल्या कष्टकरी संघर्ष महासंघाच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते चिंचवडमध्ये आले होते.

त्यावेळी ते मीडियाशी बोलत होते. सर्व ठिकाणी सर्व मदत सुरु असून एनडीआऱएफच नाही, तर लष्कर आणि नौदलाचीही मदत पूरग्रस्त भागातील बचाव कार्यासाठी घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पूर्ण तयारीने काम सुरु असून कुठेही दूर्लक्ष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्यांनाच सतर्क करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. कोयना धरणातील विसर्ग दहा हजाराहून पन्नास हजार क्यूसेक्सपर्यंत आता नेण्यात येणार आहे.

कारण गेल्या २४ तासात कोयना धरणाच्या भिंतीच्या आत ७२१ मिमी पाऊस झाला असून १८ टीएमसी विक्रमी पाणीसाठा जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. तेथे धरणाच्या भिंतीच्या आत २४ तासात ७२१ मिमी पाऊस झाला आहे. तो सुरुच असून त्यातून सांगली, सातारा,कोल्हापूरची स्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून कर्नाटक सरकारशी चर्चा सुरु केली असून अलमट्टी धरणातून त्यांना दोन लाख क्यूसेक्सने पाणी सोडण्यास सांगितले आहे. मात्र, अद्याप पूराचे पाणी राजापूर धरणापर्यंत गेले असून तेथून दोनशे किलोमीटर दूरवर अलमट्टी आहे,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 

Related Stories

No stories found.