चंगळवादामुळे किसन वीर कारखाना अडचणीत; शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढविणार 
MLA Makrand Patil attack on BJP leader Madan Bhosale

चंगळवादामुळे किसन वीर कारखाना अडचणीत; शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढविणार 

किसन वीर कारखान्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दोन वेळा सखोल चर्चा झाली होती. किसनवीर साखर कारखान्याची संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे.

शिरवळ : चंगळवादामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असलेला भुईंज येथील किसन वीर कारखाना अडचणीत आला आहे. पण शेतकऱ्यांच्या हिताकरिता व किसन वीर आबांच्या नावाचा कारखाना वाचविण्याकरिता कारखान्याची निवडणूक लढवण्यात येणार आहे, असे सुतोवाच वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी शिरवळ येथील  कार्यक्रमात बोलताना केले. Kisan Veer factory in trouble due to chauvinism; Will fight elections for the benefit of farmers

शिरवळ (ता. खंडाळा ) येथील न्यू कॉलनी सत्यज्योत तरुण मंडळाच्या समाज मंदिराचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले होते. यावेळी आमदार श्री. पाटील म्हणाले, किसन वीर आबांच्या नावाने साखर कारखाना सुरु आहे त्यांच्या नावाचा कारखाना बंद पडू नये ही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर आमचीही धारणा आहे. 

चंगळवादामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असणारा भुईंज येथील किसन वीर कारखाना हा अडचणीत आला आहे. राज्य शासनाने शेतकरी बांधव अडचणीत येऊ नये याकरिता कारखाना सुरु करण्यासाठी ३० कोटी रुपये भागभांडवल दिले म्हणून गेल्यावर्षी उशीराने का होईना, किसन वीर कारखाना सुरु होऊ शकला. यापूर्वी किसन वीर कारखान्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दोन वेळा सखोल चर्चा झाली होती. किसनवीर साखर कारखान्याची संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे. 

त्यांनी याबाबत अभ्यास करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना वाचविण्याकरिता काय करता येईल, याचा अभ्यास करून सांगतो असे सांगितले आहे. याबाबत पुढील आठवड्यामध्ये पुन्हा त्यांच्यासोबत बैठक झाल्यावरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, आदेश भापकर, दिलीप गुंजवटे, विकास तांबे, सचिन राऊत, रिजवाना काझी, आशा कारळे, प्रकाश परखंदे, चंद्रकांत मगर, समीर काझी, बाळासाहेब जाधव, ताहेर काझी आदी उपस्थित होते. अजय चौगुले यांनी प्रास्ताविक केले. मोहन कासुर्डे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.