Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar

माणच्या सर्वपक्षीय एकीत मी असतो तर इथलं चित्र वेगळ असतं : रामराजे

प्रभाकर घार्गे म्हणाले, शिवतेज मिल्कच्या शुभारंभाच्या निमित्ताने निवडणूकीनंतर प्रथमच एकत्र येण्याचा योग आला. आपली एकीची गाठ बांधली गेलीय. फक्त विश्वासाच राजकारण करत दोन्ही तालुक्याची बांधणी करायची आहे. रामराजेसाहेबांनी या मतदारसंघावर लक्ष द्यावं.

बिजवडी : माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पक्ष, गटतट बाजूला ठेऊन एकत्र येत चांगली लढत दिली. तुम्ही सर्वजण एकत्र आलात पण मला बोलवल नाही. मी आलो असतो तर आज इथलं चित्र वेगळच असतं असो... निदान आतातरी ही एकीची मोट निसटून देऊ नका. बाकीचं मी बघतो, असे सूचक विधान विधान परिषदेचे सभापती रामराजे ना.निंबाळकर यांनी केले.

बिजवडी (ता. माण) येथे सोनाई डेअरी संचलित शिवतेज मिल्क दूध संकलन केंद्राच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माने सोनाई डेअरीचे मुख्य कार्यकारी संचालक विष्णुकुमार माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, अक्षयमहाराज भोसले, अमृत पोळ, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक महेंद्र अवघडे, सहकार बोर्डाचे संचालक पिंटूशेठ जगदाळे, विजय भोसले, विकास निंबाळकर, तानाजी मगर, दौलतराव जाधव उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, कोणतेही उद्योगधंदे, व्यवसाय करताना सरकारवर अवलंबून न राहता आपल्या हिंमतीवर उभे करा. संदीप भोसले या युवकाने दुग्ध व्यवसाय उभा केला असून त्यांना सर्व शेतकऱ्यांनी साथ द्यावी. आपल्या भागात एमआयडीसी, कारखाने उभारले जातायत. पण यात काम करणारी मुल ही सर्व बाहेरची आहेत.

याच प्रमुख कारण काय असेल तर आपल्या भागात आयटीआयची मुलं कमी आहेत. यासाठी मुलांनी आयटीआयचे शिक्षण घेणे गरजेचे आहे.  माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पक्ष, गटतट बाजूला ठेऊन एकत्र येत चांगली लढत दिली. तुम्ही सर्वजण एकत्र आलात पण मला बोलवल नाही. मी आलो असतो तर आज इथलं चित्र वेगळच असतं असो... निदान आतातरी ही एकीची मोट निसटून देऊ नका. बाकीचं मी बघतो! 

प्रभाकर घार्गे म्हणाले, शिवतेज मिल्कच्या शुभारंभाच्या निमित्ताने निवडणूकीनंतर प्रथमच एकत्र येण्याचा योग आला. आपली एकीची गाठ बांधली गेलीय. फक्त विश्वासाच राजकारण करत दोन्ही तालुक्याची बांधणी करायची आहे. रामराजेसाहेबांनी या मतदारसंघावर लक्ष द्यावं.

अनिल देसाई म्हणाले, रामराजेसाहेब तुम्ही वरचेवर घाट चढून येत जा. तुमची या तालुक्यांना गरज आहे. घार्गे साहेब तुमच्या कारखान्याला ऊस अजून हवा असेल तर या भागाला लवकर पाणी देण्यासाठी प्रयत्न करा. यावेळी एम.के.भोसेले ,संजय भोसले ,मामूशेठ विरकर आदींनी मनोगते व्यक्त केली.अक्षय महाराज भोसले यांनी सुत्रसंचालन केले. शिवतेज मिल्कचे व्यवस्थापक संदीप भोसले यांनी प्रास्ताविक केले. सहव्यवस्थापक विक्रम भोसले यांनी आभार मानले.

त्या दोघांना व तुमच्या उमेदवाराला शुभेच्छा...!

मनोगतात ''आमचं ठरलंय'' टिम मधील माजी आमदार प्रभाकर घार्गे, अनिल देसाई यांनी रामराजे ना.निंबाळकर यांना माण- खटाववर तुम्ही लक्ष द्यावं, असे म्हटले होते. तोच धागा पडकून रामराजे म्हणाले, माझं या मतदारसंघावर चांगलच लक्ष आहे. तुमची एकी अशीच ठेवा. बाकीच मी बघतो. त्या दोघांना व तुमच्या उमेदवाराला दिपावलीच्या शुभेच्छा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com