करुणा मुंडे परळीत दाखल, पोलिसांनी मुलासह केले स्थानबद्ध; अॅट्राॅसिटीही दाखल..

दोन दिवसांपुर्वी करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत परळीत येऊन पत्रकार परिषदेत त्यासंदर्भातील पुरावे देणार असल्याचे जाहीर केले होते.
करुणा मुंडे परळीत दाखल, पोलिसांनी मुलासह केले स्थानबद्ध; अॅट्राॅसिटीही दाखल..
Karuna Munde News Parali

परळी ः परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी दाखल झालेल्या करुणा मुंडे यांना त्यांच्या मुलासह परळी पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. दोन दिवसांपुर्वी करुणा मुंडे यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत आपण परळीत सासरी येऊन अनेक गोष्टींचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे जाहीर केले होते. आपल्याला जीवे मारण्याच्या जिवंत जाळण्याच्या धमक्या येत असल्या तरी आपण परळी येऊन पत्रकार परिषद घेणारच असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

दुपारी बारा वाजता त्या पत्रकार परिषद घेणार होत्या. दुपारी दोन वाजता करूणा मुंडे आपल्या मुलासह परळीत दाखल झाल्या परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले आहे. परळी पोलीस ठाण्यासमोर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळे परळीत सध्या तणावाचे वातावरण आहे.

गेल्या सात-आठ महिन्यांपासून करुणा मुंडे व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये संघर्ष झडतो आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत परळीत येऊन पत्रकार परिषदेत त्यासंदर्भातील पुरावे देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानूसार त्या आपल्या मुलासह परळीत दाखल झाल्या.

तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रंचड बंदोबस्त तैनात केला होता. करुणा मुंडे परळीत दाखल होताच पोलिसांनी त्यांना मुलासह स्थानबद्ध केले आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले आहेत. यावेळी त्यांनी करुणा मुंडे मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या. करुणा मुंडे सकाळी दहा वाजता बीडमध्ये आल्या, त्यानंतर अकरा वाजता त्या परळीत दाखल होणार होत्या.

परतु दुपारी दोनपर्यंत त्या पोहचल्या नव्हत्या. अडीच वाजता अचानक करुणा मुंडे आपल्या मुलासह परळी शहरात दाखल झाल्या, पण पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध करत ताब्यात घेतले. करूणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केल्यामुळे पोलिसांनी शहरात व पत्रकार परिषदे होणार असलेल्या वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.  यात महिला पोलीसांची संख्या लक्षणीय होती.

दरम्यान करुणा मुंडे यांच्यावर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल झाल्याची देखील माहिती आहे. सध्या परळीत तणावाचे वातवरण असून पोलिसांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in