समाजाला वेठीस धरण्याऐवजी राजकारण्यांवर दबाव वाढवा..

५० टक्क्यांची मर्यादा असल्यामुळे अपवादात्मक परिस्थीती देखील नमूद करावी लागेल.
समाजाला वेठीस धरण्याऐवजी राजकारण्यांवर दबाव वाढवा..
Chhatrapati Sambhajiraje Aurangaabad News

औरंगाबाद ः मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत समाजाने ५८ मोर्चे काढले, अजून मोर्चे काढून समाजाला किती वेठीस धरणार? यापेक्षा राजकारण्यांवर दबाव वाढवून त्यांना वेठीस धरा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. (Increase pressure on politicians instead of holding society hostage.)  मराठा क्रांती मोर्चाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संभाजीराजे यांनी हजेरी लावली.

यावेळी त्यांनी १२७ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना अधिकार मिळाले असले तरी लगेच मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असेही स्पष्ट केले. ( Mp Smbhajiraje Chhatrapati) संभाजी राजे म्हणाले, केंद्राने घटनादुरुस्ती करत राज्याला अधिकार दिले असले तरी लगेच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, तसे ते देता येत नाही. आता नव्याने मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी सामाजिक मागासपण सिध्द करावे लागेल.

एवढेच करून चालणार नाही तर ५० टक्क्यांची मर्यादा असल्यामुळे अपवादात्मक परिस्थीती देखील नमूद करावी लागेल. त्यामुळे ही कायदेशीर लढाई लढायला बराच वेळ लागू शकतो. पण त्याआधी राज्य सरकारला जे करणे शक्य आहे, जे त्यांच्या हातात आहे, ते तरी त्यांनी करावे. पुन्हा मोर्चे काढून समाजाा वेठीस धरणे योग्य ठरणार नाही.

आता राजकारण्यांवर दबाव वाढवावा लागेल, त्यांनाच वेठीस धरावे लागेल. मराठा समाजाला पुढारलेला ठरवून सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. आता नव्या घटनादुरुस्तीनंतर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा राज्याकडे आला आहे. समाजाला मागास ठरवणे, ५० टक्के मर्यादा असल्यामुळे अपवादात्मक परिस्थिती नमूद करणे हा तिढा कसा? कधी सुटणार हा खरा प्रश्न आहे.

तीन पक्षांच्या सरकारमध्ये समन्वय नाही..

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका देखील संभाजीराजे यांनी केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १ हजार कोटी रुपयांची मागणी, २५ लाखांच्या कर्जाचा प्रस्ताव आणि १५ आॅगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण अजूनही ते सुरू होऊ शकले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.