`मला पुन्हा उमेदवारी मिळो अथवा न मिळो; पण मी भाजप सोडणार नाही`

रक्षा खडसे यांच्या स्पष्टीकरणाने जळगाव जिल्ह्यात भाजपला दिलासा
raksha-khadse-ff.jpg
raksha-khadse-ff.jpg

जळगाव :  ``कुटुंबातील कोणाचाही माझ्यावर दबाव नाही. मला भविष्यात उमेदवारी मिळो अथवा न मिळो पण मी भारतीय जनता पक्षातच राहीन,  याची ग्वाही भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले आहे.

चोपडा येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझा पहिला पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जिल्हा परिषद सदस्य, दोनदा लोकसभा निवडणूकीत बहुमताने विजयी झाली आहे. 'मला भविष्यात लोकसभेची उमेदवारी मिळो अथवा न मिळो मी भारतीय जनता पक्षातच माझे कार्य करेन. पक्षासोबतच राहील. माझ्यावर कुटुंबातील कुणाचाही दबाव नाही, मी पक्ष सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

एकनाथ खडसे पक्ष सोडून गेल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे. या बैठकीत रक्षा खडसे यांनी हे स्पष्ट केले.

बैठकीस पक्षाचे संघटनमंत्री विजयराव पुराणीक, गिरीश महाजन, संघटनमंत्री किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू भोळे आदी उपस्थित होते. चोपड्यात मात्र भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून नेत्यांनी जोशात भाषणे केली. आजच्या बैठकीतून भाजप कार्यकर्त्याची ताकद भक्कम असल्याचे सिध्द झाल्याचे तसेच चोपडा हा भाजपचाच बालेकिल्ला कायम असल्याचे दिसून आले.

या वेळी महाजन म्हणाले की भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनीदेखील त्याग आणि मेहनतीच्या बळावर त्यांना पक्षाने पंतप्रधान पदावर बसवले आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने कोणी जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार - खासदार सोडा, भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता देखील पक्ष सोडणार नाही, असा विश्वास माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चोपडा येथील भाजपच्या बैठकीत व्यक्त केला. पक्ष वाढविण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी,प्रमोद महाजन गोपिनाथ मुंढे आदी नेत्यांनी खुप मेहनत घेतली आहे. एका विचार धारेवर पक्ष चालत आहे. मी आहे म्हणून पक्ष आहे. असे म्हणणारे आता इतिहासजमा झाले. आज जे भाजप सोडत आहेत त्यांची दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

 
विजय पुराणिक म्हणाले की, कोविडच्या काळात भाजपा कार्यकर्त्यांनी लोकाची सेवा करित आसतांना स्वतःचा जीव धोक्यात घालुन काम केले. भाजपाचे काम करण्याचा उद्देश हा सर्व सामान्य लोकांची सेवा करणे हाच आसला पाहिजे. असे विजय पुराणिक म्हणाले. केंद्र सरकारमध्ये असलेल्या मोदी सरकारने शेतकरी, महिलांसाठी विविध योजना आणल्यात ह्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात असेही त्यांनी आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com