सौदे करून कधीच राजकारण केले नाही, कारण मी राजकीय व्यापारी नाही...

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. फोन टॅपिंग करण्यात आले. दानवें आणि संजय काकडेंसोबतही तेच करण्यात आले. त्यांनी बदमाशीचं काम का केले. ते त्यांनी आधी सांगावे.
सौदे करून कधीच राजकारण केले नाही, कारण मी राजकीय व्यापारी नाही...
Nana Patole

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने नव्हे, तर मागील सरकारने माझ्यावर पाळत ठेवली. माझ्यावर काय पण दानवे Danwe आणि संजय काकडे Sanjay Kakde यांच्यावरही त्यांनी पाळत ठेवली होती. फोनही टॅप केले होते, त्याबद्दल मी बोललो. दबाव टाकून पदे मिळवून घेणाऱ्यांमधला मी नाही. सौदे करून मी कधीच राजकारण केले नाही. कारण मी राजकीय व्यापारी नाही, I have never done politics by making deals because i am not political businessman तर सामान्य कुटुंबातून पुढे आलेला एक कार्यकर्ता आहो, असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना Nana Patole म्हणाले. 

पवार साहेब मोठेच...
‘मी जेथे कोठे जातो, तेथे माझ्यावर पाळत ठेवली जाते’, असे विधान नाना पटोले यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये जरा जास्त बिनसले, अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यानंतर नाना पटोले यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. पटोले म्हणाले, मागील सरकारने पाळत ठेवली या सरकारने नव्हे, असे माझे म्हणणे होते. काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘नाना पटोले लहान व्यक्ती’, असे म्हटले होते. त्यावर बोलताना पटोले म्हणाले, पवार साहेब मोठेच आहेत. त्यांच्या कोणत्याही बोलण्याचा आम्हाला राग येण्याचा प्रश्‍नच नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. 

कालच शरद पवारांनी सांगितले आहे की, सरकार वेगळे आणि पक्ष वेगळा. सर्व पक्षांना आपले संघटन वाढविण्याची स्वायत्तता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, कामाला लागा. याचा अर्थ महाविकास आघाडीत धुसफुस आहे, असा होत नाही. सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पद्धतीने कामाला लागतात. काम करण्यासाठी पाच वर्ष कुणीही वाट बघत नाही. नेहमी तयारी सुरूच असते. रात्री ३ वाजेपर्यंत आमच्या बैठका चालतात आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतो, असेही नाना म्हणाले. 

फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. फोन टॅपिंग करण्यात आले. दानवें आणि संजय काकडेंसोबतही तेच करण्यात आले. त्यांनी बदमाशीचं काम का केले. ते त्यांनी आधी सांगावे. त्यांच्या सरकारमध्ये हीच कामे झाली आहेत. म्हणून विधानसभेत आम्ही चौकशीची मागणी केली. फडणवीसांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही धुसफुस नाही. तर आमचा विरोधक हा भारतीय जनता पक्ष आहे. त्यांच्याच विरोधात आमची लढाई आहे, असे नाना पटोले म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.