राज्यपालांच्या भाषेवर आक्षेप घेणाऱ्या पवारांना मुख्यमंत्र्यांची भाषा कशी चालते...

शरद पवारांनी राज्यपालाच्या पत्रातील भाषेवर आक्षेप घेत त्यांची तक्रार पंतप्रधानांकडे केली आहे. मुळात राज्यपालांची तक्रार ही राष्ट्रपतींकडे करावी लागते हे त्यांना माहित असायला हवे. दुसरीकडे राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व नाराजी व्यक्त करणाऱ्या पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेचे मात्र समर्थन केले आहे.
Vijaya rahatkar twite agianst shrad pawar news
Vijaya rahatkar twite agianst shrad pawar news

औरंगाबाद ः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतिसंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात रंगलेल्या पत्र युध्दानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यपालांनी पत्रात वापरलेल्या भाषेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. राज्यपाल हे घटनात्मक पद असल्यामुळे अशी भाषा वापरणे त्यांना शोभत नाही, असे म्हणत पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवून समज देण्याची विनंती केली होती. या वादात भाजपच्या महिला राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी उडी घेतली आहे. राज्यपालांच्या भाषेवर आक्षेप घेणाऱ्या शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची भाषा चालते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्वच धार्मिक स्थळ बंद आहेत. काल भाजपच्या वतीने मंदिरे खुली करा, या मागणीसाठी राज्यभरात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून तुम्ही हिंदुत्व विसरलात का?, मंदिरे बंद ठेवा असे दैवी संकेत तुम्हाला मिळाले आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी आम्हाला तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांशी हसत बोलणे आमच्या हिंदुत्वात बसत नाही, असे म्हणत पत्राद्वारेच प्रतिउत्तर दिले होते.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हिंदुत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करणे, आणि त्यासाठी वापरलेल्या भाषेवरून शरद पवार हे देखील आश्चर्यचकित झाले होते. राज्यपालांना ही भाषा शोभत नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून राज्यपालांना समज देण्याची विनंती केली होती. परंतु या पत्र प्रपंचावरून अजूनही वाद सुरूच असून भाजप महिला राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

रहाटकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, शरद पवारां हे ज्येष्ठ नते आहेत, त्यांनी राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप घेत त्यांची तक्रार पंतप्रधानांकडे केली आहे. मुळात राज्यपालांची तक्रार ही राष्ट्रपतींकडे करावी लागते हे त्यांना माहित असायला हवे. दुसरीकडे राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व नाराजी व्यक्त करणाऱ्या पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेचे मात्र समर्थन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com