धास्ती वाढली : उपराजधानीत कोरोना बळींचा ब्लास्ट, आज ४६ मृत्यू 

कोरोनाने होणारे मृत्यू आणि बाधितांचा घटनाक्रम सुरू असतानाच मागील २४ तासांत २०७ जण बाधा झाल्यानंतर कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे उपचारातून बरे होऊन कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढून ७ हजार ६३६ पर्यंत पोचली आहे. गृहविलगीकरणासह कोरोनामुक्त होण्याचे नागपुरातील हे सरासरी प्रमाण गुरूवारी चार टक्क्यांनी वाढले.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढत चालला आहे. बाधितांच्या संख्येसोबत मरणाऱ्यांची संख्यादेखील वेगाने वाढत चालली आहे. प्रशासनासह नागरिकांतही चिंता वाढली आहे. आज शहरात ४६ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा आजवरचा उच्चांक आहे. आज एकाच दिवसात ९८९ जण बाधित झाले. मृत्यूचा आकडा ६२५ तर बाधितांचा आकडा १८ हजारांच्या जवळपास पोचला आहे. 

नागपुरात यापूर्वी ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी ४० मृत्यू झाल्याचा रेकॉर्ड होता. याशिवाय दोन वेळा ३९ जण दगावले होते. तर १२ ऑगस्ट रोजी ३८ जण एकाच दिवशी दगावले होते. परंतु आज शहरातील कोरोना मृत्यूमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एकाच दिवशी ४६ मृत्यूंचा नवा विक्रम झाला. यात शहरातील ३८ जणांचा समावेश असल्याने शहरात भयावह वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर ग्रामीण भागातील ४ आणि नागपूर बाहेरच्या ४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर मेडिकलमध्ये आज २० तर मेयोत २१ जणांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयांत ३ जण दगावले. खासगी रुग्णालयात दगावलेल्यांचा टक्का हळूहळू वाढत आहे. १ ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात केवळ ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद होती. मात्र अवघ्या २० दिवसांत नागपुरात खासगी रुग्णालयांत ४२ जण दगावले आहेत. 

मेडिकल आणि मेयोमध्ये मृत्यूचा ब्लास्ट होत आहे. १ ऑगस्टला मेडिकलमध्ये ६३ तर मेयोत ७० मृत्यूंची नोंद झाली होती, परंतु २० दिवसांनंतर मेडिकलमध्ये २९९ तर मेयोत २८२ मृत्यूची नोंद झाल्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवरील विश्वास उडाला असल्याची जोरदार चर्चा येथे आहे. विशेष असे की, मेडिकलमधील कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्याकडेही दुर्लक्ष करण्यात मेडिकल प्रशासनाने कोणताही कसर सोडली नाही. गुरूवारी नव्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्यांमध्ये अँटिजन रॅपिड टेस्टमध्ये ३६० नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर खासगी प्रयोगशाळेतून २४३ तर मेडिकलमधून २१, मेयोतून १९०, एम्समधून १३६, माफ्सूमधून ३८ तर निरी प्रयोगशाळेतून एका जणांच्या घशातील द्रवाचे नमुने कोरोना बाधित आढळले आहेत. मेयो, मेडिकलसह विविध कोविड सेंटरमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या २ हजार ७०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी वाढली 
कोरोनाने होणारे मृत्यू आणि बाधितांचा घटनाक्रम सुरू असतानाच मागील २४ तासांत २०७ जण बाधा झाल्यानंतर कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे उपचारातून बरे होऊन कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढून ७ हजार ६३६ पर्यंत पोचली आहे. गृहविलगीकरणासह कोरोनामुक्त होण्याचे नागपुरातील हे सरासरी प्रमाण गुरूवारी चार टक्क्यांनी वाढले. ४४ वरून ते ४८. ८९ टक्क्यांवर आले आहे.    (Edited By : Atul Mehere)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com