Harshvardhan Patil appeals indapur people to fight corona collectively | Sarkarnama

इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले, `संघटितपणे कोरोना घालवू'

संपत मोरे
रविवार, 17 मे 2020

"कोरोनाचे रुग्ण सापडले म्हणून घाबरून जायचं कारण नाही. आपण सगळ्यांनी सावधगिरी बाळगली तर आपण कोरोनाचा पराभव करू शकतो," असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेला केले आहे.

पुणे - "कोरोनाचे रुग्ण सापडले म्हणून घाबरून जायचं कारण नाही. आपण सगळ्यांनी सावधगिरी बाळगली तर आपण कोरोनाचा पराभव करू शकतो," असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेला केले आहे.

इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथील दोन व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या दोन व्यक्ती बाहेरून आल्या होत्या. याबाबत पाटील यांनी लोकांना सावधगिरीचे आवाहन केले.

"आपल्या तालुक्यात आजवर कोरोना बाधित व्यक्ती नव्हत्या. मात्र दुर्दैवाने आता आपल्या तालुक्यात रुग्ण सापडले आहेत. मात्र यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. आपल्या गावात जे बाहेरून लोक येत आहेत. त्यांनाही समजून सांगावे. सर्वांनी सोशल डिस्टन्स ठेवून रहावे," असे पाटील म्हणाले.

"कोरोनाच्या संदर्भात प्रशासन अतिशय चांगले काम करत आहे. आपण सगळ्यांनी प्रशासनाला साथ दिली पाहिजे. सगळ्यांनी मिळून या आजारावर मात करायची आहे," असे पाटील म्हणाले.

"तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडले म्हणून घाबरू नका. पण काळजी घ्या. आपण संघटितपणे कोरोना घालवायचा आहे. प्रशासन जे सांगत आहे. ते नियम आपण पाळा," असे पाटील म्हणाले.

"प्रत्येकाने आपल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची आपण सर्वांनी खबरदारी घेऊ व प्रशासनाला सहकार्य करू," असे पाटील यांनी म्हटले आहे.

"सर्वांनी एकत्रितपणे लढून कोरोनवर मात करू. प्रत्येकाने स्वतःला शिस्त लावली पाहिजे. नियम पाळले पाहिजेत. सकारात्मक मार्गाने आपण कोरोनाच्या विरोधात लढूया," असे पाटील म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख