संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपुजन आधी, मगच झेडपी इमारतीचे उद्घाटन..

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीसाठी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव झालेला आहे.
संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपुजन आधी, मगच झेडपी इमारतीचे उद्घाटन..
Ncp Mla Sandip Kshirsagr Beed News

बीड : जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी भूमिपुजन केल्यानंतरच नवीन प्रशासकीय इमारतीचे उद॒घाटन करण्यात येईल, या तोडग्यानंतर मराठा क्रांती मोर्चातर्फे सुरु केलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. (Before the ground breaking of the statue of Sambhaji Maharaj, then the inauguration of the ZP building) जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणीबाबत २०१७ मध्ये सर्वसाधारण सभेत ठराव संमत झाला.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीच्या एका टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून नव्या इमारतीच्या उद॒घाटनाच्या हालचाली सुरु आहेत. (Ncp Mla Sandip Kshirsagar Beed) मात्र, नव्या इमारतीसमोर अगोदर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवावा आणि मगच नव्या इमारतीचे उद॒घाटन करावे, अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे प्रेमींनी घेतली.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर या मागणीसाठी सोमवारी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, सभापती जयसिंह सोळंके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. पुतळा उभारणीचा ठराव झाला असला तरी निधी मंजूरी, पुतळ्याची निर्मिती करुन उभारणी करण्यासाठी किमान सात महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तेवढा काळ जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची असलेली प्रशासकीय इमारत वापरत न आणणे चुकीचे आहे. मात्र, अगोदर पुतळ्याचे भूमिपुजन केले जाईल व नंतरच इमारतीचे उद॒घाटन केले जाईल, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले.

यावर आंदोलन मागे घेण्यात आले. राजेंद्र मस्के, भारत काळे, बी. बी. जाधव, मंगेश पोकळे, स्वप्नील गलधर, प्रकाश कवठेकर, अशोक लोढा, जयदत्त धस, सुहास पाटील, रमेश चव्हाण, किशोर पिंगळे, युवराज जगताप, शरद चव्हाण, विठ्ठल बहीर, महेश धांडे, शैलेश जाधव, नितीन धांडे, श्रीकांत बागलाने, भगवान मस्के, युवराज मस्के, विजय लव्हाळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.