सरकार पाच वर्ष टिकणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका...

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यानी ओमराजेना दिलेली वागणुक ही जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यातील आजवरची राजकीय समीकरण माहिती असलेल्यांना बंद खोलीत काय चर्चा झाली असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.शत्रुचा शत्रु मित्र या राजकारणातील समीकरणानूसार शरद पवार यांनी एकप्रकारे ओमराजे यांना बळ दिल्याचे दिसून आले.
Sharad pawar meeting news osmanabad
Sharad pawar meeting news osmanabad

उस्मानाबाद : सरकार पाच वर्ष टिकणार असुन सगळ्यांनी समन्वयाने काम करण्याचा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला. रविवारी रात्री त्यांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक बोलावली होती, यामध्ये जिल्ह्यातील राजकीय घडामोडीवर चर्चाही झाली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याबरोबर त्यानी अर्धा तास बंद खोलीत खलबत केल्याची माहिती आहे.  यावेळी कौटुंबिक तसेच जिल्ह्याच्या राजकारणावर प्रकाश टाकण्यात आल्याचे बोलले जाते.

शरद पवार ज्या जिल्ह्यात जातात, तिथे काहीतरी संदेश देऊनच जातात. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. रविवारी ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर दिवसभर त्यांनी नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर रात्री महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांना एकत्रित बोलावून बळ देण्याचा प्रयत्न केला. या बैठकीमध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. 

दिवसभर दौऱ्यामध्ये खासदार ओमराजे यांना त्यानी सोबत ठेवले तर रात्री त्यांच्याशी किमान अर्धा तास विविध विषयावर चर्चा केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यानी ओमराजेना दिलेली वागणुक ही जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यातील आजवरची राजकीय समीकरण माहिती असलेल्यांना बंद खोलीत काय चर्चा झाली असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शत्रुचा शत्रु मित्र या राजकारणातील समीकरणानूसार शरद पवार यांनी एकप्रकारे ओमराजे यांना बळ दिल्याचे दिसून आले. यातून जिल्ह्यात महाविकास आघाडी अधिक बळकट करण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

त्या सदस्यावर कारवाईची मागणी 

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणून आलेले सदस्य फुटलेच कसे असा प्रश्नही पवार यानी स्थानिक नेत्यांना केला. त्यावेळी या नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली. या संदर्भात.पवार यानी संपुर्ण माहिती घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पुढील काळात बंडखोरी केलेल्या सदस्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकार पाच वर्ष टिकणार असुन त्याची अजिबात तुम्ही लोकांनी काळजी करायची आवश्यकता नाही. राज्यस्तरावर तिन्ही पक्षात समन्वयाने काम सूरु असुन स्थानिक पातळीवरही तुमच्याकडुन अशाच कामाची अपेक्षा आहे. त्यामुळे आपापसामधील वाद मिटवुन सर्वानी एकत्र काम करा, अशा सूचनाही पवारांनी बैठकीत दिल्या. तुमच्याबरोबर राज्याचे सरकार असल्याने जनतेच्या प्रश्नाची सोडवणुक करण्यासाठी कुठेही कमी पडु नका असा सल्ला त्यानी यावेळी दिला.

Edited By : Jagdish pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com