संजय राठोड यांना सरकार पाठीशी घालतंय...

या सरकारला राज्यात महिला सुरक्षित नाही, याची जरा जरी जाण असेल तर या आणि अशा प्रकरणात कठोर पावले उचलावित. अन्यथा, जनता यांना यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.
संजय राठोड यांना सरकार पाठीशी घालतंय...
The government is backing Sanjay Rathore: Chitra Wagh

पुणे : 'पूजा चव्हाणचे प्रकरण' ताजे असताना यवतमाळ येथील महिलेने तिच्या पतीची बदली व्हावी, या करता आघाडी सरकारमधील वादग्रस्त माजी मंत्री संजय राठोड यांनी चक्क तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. The government is backing Sanjay Rathore: Chitra Wagh

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चालढकल करून अजून गुन्हा दाखल केलेला नाही. त्यातील तपास अधिकारी श्री. लगड यांना तात्काळ निलंबित करावे, ही मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रवीण दरेकर यांनी केली. परंतु, सरकारमधील मंत्र्याला वाचविण्यासाठी केलेला खटाटोप हा जनतेने पाहिला. हे प्रकरण ताजे असतानाच यवतमाळ येथील एका महिलेने संजय राठोड यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप करून यवतमाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हे सगळे प्रकार पाहता सरकार राठोड यांना पाठीशी घालत असल्याचा संशय येतो, असा चित्रा वाघ यांनी आरोप केला. त्या म्हणाल्या, या सरकारला राज्यात महिला सुरक्षित नाही, याची जरा जरी जाण असेल तर या आणि अशा प्रकरणात कठोर पावले उचलावित. अन्यथा, जनता यांना यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वाघ यांनी दिला. यावेळी सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर, सोनाली भोसले, सपना तावडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.