काय सांगता? भक्तांना आता उंदराच्या कानातही इच्छा सांगता येईना!

गणपतीपुळ्यात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असून, बाहेरील उंदराभोवतीही लोखंडी कडे उभारण्यात आले आहे.
ganpatipule temple install barricade around mouse idol due to covid19
ganpatipule temple install barricade around mouse idol due to covid19

रत्नागिरी : गणपतीपुळेतील श्री गणेशाच्या दर्शनाला राज्यभरातून शेकडो भाविक येत आहेत. भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने बाहेरूनच भाविक दर्शन घेताना दिसत आहेत. मात्र, येथील मंदिरातील उंदराच्या कानात भाविक त्यांची इच्छा सांगताना दिसतात. आता उंदराच्या कानात इच्छा सांगण्यासाठी भाविक तोंड जवळ नेत असल्यामुळे भाविकांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने उंदराभोवती लोखंडी कडे उभारले. 

गणपतीपुळ्यात येणारे बहुतांश पर्यटक हे पश्‍चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यातील आहेत. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. याच भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. येथील भाविकांचे प्रमाण आता अधिक दिसत आहे. त्यांच्या स्पर्शाने मंदिरातील उंदीर कोरोनाचा प्रसारक ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणून भक्‍तांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी मंदिर प्रशासनाने उंदरापर्यंत जाण्यास मज्जाव केला आहे. आता भक्‍तांना उंदराचे लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे. 

भाविकांना आता उंदराच्या कानात आपली इच्छा सांगण्याता येत नसल्याने नाराजी आहे. आता भाविक मंदिराच्या दरवाज्याबाहेर उभे राहून हात जोडून निघून जात आहेत. या विषयी बोलताना गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे म्हणाले की, कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी मंदिर बंद आहे. आता उंदराभोवतीही लोखंडी कडे बसवले आहे. यामागे भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणे हा यामागील उद्देश आहे. 

उंदराच्या कानात सांगितलेली इच्छा ही थेट गणेशापर्यंत पोचते, अशी भक्‍तांची श्रध्दा आहे. त्यामुळे अनेक भक्‍त उंदराच्या एका कानात इच्छा व्यक्‍त करतात. देवापर्यंत इच्छा, नवस पोहोचविण्याचा उंदीर हा एक आधार होता. आता कोरोनाचे सावट इथेही दिसत आहे. उंदराच्या कानात इच्छा सांगताना प्रत्येक व्यक्‍तीचे तोंड उंदराच्या मूर्तीच्या कानाजवळ जाते. त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता असल्याने प्रशासनाने आता उंदराभोवती लोखंडी कडे उभारले आहे. 

हे ही वाचा : धारावीत पुन्हा वाढले कोरोनाचे रुग्ण 
मुंबई : अनलॉक 4 नंतर मुंबईसह धारावीमधील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दादर-माहीम या जी उत्तरमधील परिसरातील ही वाढ कायम आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतलेल्या पालिकेच्या धारावी पॅटर्नमुळे येथील कोरोना प्रसार नियंत्रणात आला होता; मात्र आता पुन्हा एकदा कोरोना आपले हात-पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. महिन्याभरापूर्वी धारावीतील रुग्णसंख्या 1; तर जी उत्तरमधील रुग्णसंख्या 25 पर्यंत खाली आली होती. मात्र अनलॉक 4 नंतर आता ही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसते. 10 दिवसांपूर्वी जी उत्तर विभागातील एकूण रुग्णसंख्या 8,308 इतकी होती. त्यात 1,385 रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या आता 9,693 इतकी झाली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com