कोरोना परिणाम : अष्टविनायकांमधील चार गणपती मंदिरे देवदर्शनासाठी बंद!

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता राज्यातील अष्टविनायकांमधील मोरगाव, सिध्दटेक, थेऊर, व रांजणगाव या चार प्रमुख अष्टविनायक देवस्थानांनी ३१ मार्च पर्यंत संपूर्ण मंदिर परिसर तसेच भाविकांना देव दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला.

शिक्रापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता राज्यातील अष्टविनायकांमधील मोरगाव, सिध्दटेक, थेऊर, व रांजणगाव या चार प्रमुख अष्टविनायक देवस्थानांनी ३१ मार्च पर्यंत संपूर्ण मंदिर परिसर तसेच भाविकांना देव दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला असून धार्मिक दृष्ट्या व राज्यातील भाविकांसाठी हा मोठा निर्णय म्हणावा लागेल.

याबाबत मोरगाव, सिध्दटेक, थेऊर देवस्थानचे वतीने प्रवक्ते-विश्वस्थ अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांनी ३१ मार्च ही देवस्थान बंद ठेवण्याची तारीख जाहिर केली तर रांजणगाव देवस्थानचे वतीने उपाध्यक्ष नारायण पाचुंदकर यांनी देवस्थान पुन्हा सुरू करण्याची तारीख शासनाच्या निर्णयावर सोपविली आहे.

संपूर्ण वर्षभर आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला संपूर्ण राज्यच नव्हे तर देशातून अष्टविनायक दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यात रांजणगाव, लेण्याद्री, थेऊर, मोरगाव व ओझर ही पाच गणपती देवस्थाने असून उर्वरित पाली, महड, सिध्दटेक ही तीन अन्य जिल्ह्यात आहेत. दरम्यान यातील थेऊर, मोरगाव व सिध्दटेक ही देवस्थाने चिंचवड देवथान ट्रस्टच्या अंतरर्गत येत असल्याने या तिनही देवस्थानच्या बाबतीतला निर्णय विश्वस्थांनी घेतला आहे. त्यानुसार उद्या (दि.१७) ते ३१ मार्च पर्यंत ही तिनही मंदिरे, मंदिर परिसर व प्रत्यक्ष देव-गाभारा हे सर्व भाविकांना पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चिंचवड देवस्थानचे विश्वस्थ व प्रवक्ते अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.

या शिवाय महागणपती रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे वतीने अध्यक्ष अ‍ॅड.विजयराज दरेकर, उपाध्यक्ष प्रा.नारायण पाचुंदकर, सचिव डॉ.संतोष दुंडे व खजिनदार शेखर देव यांनी आज रात्री तातडीने निर्णय घेवून रांजणगाव देवस्थानही पुढील शासन निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रा. नारायण पाचुंदकर यांनी दिली.
 
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com