वैर विसरून पृथ्वीराज चव्हाण भेटले विलासराव पाटील - उंडाळकरांना 

सध्या विधान परिषदेच्या १२ जागांसाठी उमेदवार निवडीची कार्यवाही सर्वच पक्षाकडून सुरू आहे. काँग्रेसलाही त्यामध्ये जागा मिळणार आहेत. त्यामध्ये ॲड. पाटील यांचे नाव घेतले जाणार का ? या चर्चेला यानिमित्ताने तोंड फुटले आहे. श्री. चव्हाण व मंत्री पाटील यांनी घेतलेल्या भेटीमुळे त्याला दुजोरा मिळाला असून
Prithviraj Chavan and Vilasrao Patil Undalkar
Prithviraj Chavan and Vilasrao Patil Undalkar

कराड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सोमवारी सायंकाळी उंडाळकर यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. पहिल्यांदाच श्री. चव्हाण यांनी उंडाळकर यांची घरी जाऊन भेट घेतल्याने या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून काँग्रेसच्या गोटात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे गेल्या अनेक वर्षापासून वैर आहे. मध्यंतरीच्या काही कारणामुळे त्यात आणखी दरी निर्माण झाली होती.  मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही गटातील संघर्ष संपून दरी कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्याला चांगले यश आले.

त्यानंतर चव्हाण -उंडाळकर गटाचे मिले सुर मेरा तुम्हारा असे वातावरन मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत दिसून आले. तेथे चव्हाण गटाचे मनोहर शिंदे यांना उदयसिंह पाटील उंडाळकर  यांनी साथ दिली. त्यामुळे तेथे शिंदे यांना विजय मिळवने सोपे झाले. मलकापूरचा पॅटर्न काँग्रेसच्या उभारणीसाठी कराड दक्षिणमध्ये राबवण्याची कार्यवाही तेव्हापासून सुरू झाले आहे. दोन्ही गट एकत्र आल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे मलकापूर पालिकेच्या निवडणुकीतून दिसून आले.

त्यामुळे चव्हाण गट तेव्हापासून उंडाळकर गटाची फारशी फारकत घेताना दिसून आलेला नाही. विधानसभा निवडणुकीत मतविभागणी टाळण्यासाठी आणि आमदार चव्हाण यांच्या सहकार्यासाठी उदयसिंह पाटील उंडाळकर यांना उमेदवारी दिल्याची मोठी चर्चा सुरू होती. विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर  दुसऱ्याच दिवशी उदयसिंह उंडाळकर चव्हाण यांच्या सत्कारासाठी गेले होते. त्यामुळे  त्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईला रवाना होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री चव्हाण,  मंत्री बंटी पाटील यांनी वेळ काढून माजी मंत्री उंडाळकर यांची सातारा येथील त्यांच्या राजविलास या बंगल्यावर जाऊन भेट घेतली.

या भेटीमध्ये जरी उंडाळकर यांच्या तब्येतीची चौकशीचे कारण सांगण्यात येत असले तरी राजकीय विषयावरही चर्चा झाल्याचे समजते. आमदार चव्हाण यांनी पहिल्यांदाच अनेक वर्षांत उंडाळकर यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय दृष्ट्या ही महत्वाची भेट मानली जात आहे. काँग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि जिल्ह्यात विस्कटलेली काँग्रेसची घडी पुन्हा बसवण्यासाठी झालेली ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेची ठरली आहे. या भेटीदरम्यान उदयसिंह पाटील हेही उपस्थित होते.

ॲड. उदयसिंह पाटीलांच्या आमदारकीची चर्चा...

सध्या विधान परिषदेच्या १२ जागांसाठी उमेदवार निवडीची कार्यवाही सर्वच पक्षाकडून सुरू आहे. काँग्रेसलाही त्यामध्ये जागा मिळणार आहेत. त्यामध्ये ॲड. पाटील यांचे नाव घेतले जाणार का ? या चर्चेला यानिमित्ताने तोंड फुटले आहे. श्री. चव्हाण व मंत्री पाटील यांनी घेतलेल्या भेटीमुळे त्याला दुजोरा मिळाला असून ॲड. पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाले आहे. त्याबाबत नेमका काय निर्णय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com