तेराशे कामगारांना घेऊन साताऱ्यातून पहिली रेल्वे मध्यप्रदेशकडे रवाना

या रेल्वेत 1320 कामगार असून त्यांना जेवणाचे पार्सल, पिण्याचे पाणी प्रशासनांकडून देण्यात आले. ही रेल्वे मध्यप्रदेशातील रेवा गावाकडे रवाना झाली. उद्या (बुधवारी) दुपारी दीडच्या दरम्यान ही रेल्वे रेवा येथे पोचणार आहे
The first train from Satara with 1300 workers left for Madhya Pradesh
The first train from Satara with 1300 workers left for Madhya Pradesh

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहती आणि इतर ठिकाणी काम करणारे मध्यप्रदेशातील विविध कामगार लॉकडाऊनमुळे साताऱ्यात अडकून पडले होते. त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रेल्वेची सोय केली होती. सातारारोडवरून ही पहिली स्पेशल श्रमिक रेल्वे आज मध्यप्रदेशातील रेवा गावाकडे मार्गस्थ झाली.

यावेळी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी संजय आसवले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन कामगारांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. 

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सातारा जिल्ह्यातील सात औद्योगिक वसाहती व इतर ठिकाणी काम करणारे परराज्यातील कामगार अडकून पडले होते. या कामगारांना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाने परवानगी दिली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांची प्रवासाची व जेवण खाण्याची सोय करायची होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी साताऱ्यात अडकून पडलेल्या १३२० कामगारांना मध्यप्रदेशात जाण्यासाठी तयारी केली. सुरवातीला या सर्वांची नोंदणी करून घेतली. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली. 

मात्र, मध्यप्रदेश प्रशासनाकडून या कामगारांना परत बोलविण्यासाठीची परवानगी मिळालेली नव्हती. सर्व कामगार त्याच्या राज्याच्या शासनाच्या परवानगीच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांना मध्यप्रदेशात येण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथून स्पेशल श्रमिक रेल्वे सोडण्यात आली.

या रेल्वेत 1320 कामगार असून त्यांना जेवणाचे पार्सल, पिण्याचे  पाणी प्रशासनांकडून देण्यात आले. ही रेल्वे मध्यप्रदेशातील रेवा गावाकडे रवाना झाली. उद्या (बुधवारी)  दुपारी दीडच्या दरम्यान ही रेल्वे रेवा येथे पोचणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर घरी जायची सोय झाल्याने सगळे कामगार आनंदीत झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com