स्वतःचे नाव स्वतःच देणारा पंतप्रधान भारताने प्रथमच बघितला...
Nana Patole - Narendra Modi

स्वतःचे नाव स्वतःच देणारा पंतप्रधान भारताने प्रथमच बघितला...

भाजपची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. कुठलेच मोठे पक्ष सोबत नसल्याने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे जनाधार घसरल्याचे व पराभवाच्या भीतीचे लक्षणे आहेत.

नागपूर : भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता घसरत चालली आहे. तरीही त्यांचा गांधीद्वेष काही कमी झाला नाही. मेजर ध्यानचंद महान खेळाडू होते. Mejar Dhyanchand was a great player त्यांच्या नावाला कुणाचाही विरोध असण्याचे काही कारण नाही. पण केवळ गांधीद्वेष म्हणून मोदींनी राजीव गांधी Rajiv Gandhi यांच्या नावे असलेल्या पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. गुजरातमधील स्टेडियमला असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलवून स्वतःचे नाव दिले. स्वतःचे नाव स्वतःच देणारा पंतप्रधान भारताने प्रथमच बघितला असल्याची खोचक टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले President of state congress Nana Patole यांनी केली. 

आज नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांचा किती द्वेष करतात, हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्यांनी दाखवून दिले. हे कोत्या मानसिकतेचे लक्षण आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलवून भाजपने मेजर ध्यानचंद असे आता नाव दिले आहे. मेजर ध्यानचंद महान खेळाडू आहेत. त्यांच्या नावाला कोणाचाच विरोध असून शकत नाही. भाजपला त्यांचे नाव आणखी एखाद्या पुरस्काराला देत आले असते. मात्र राजीव गांधी यांचे नाव हटवण्यासाठी त्यांनी मेजर यांच्या नावाचा सहारा घेतला असल्याचे पटोले म्हणाले. 

भाजपने यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव काढून गुजरातमधील एका स्टेडियमला मोदी यांचे नाव दिले आहे. स्वतःचे नाव स्वतःच देणारा पंतप्रधान भारताने प्रथमच बघितला आहे. नागपूर विमानतळावर नाना पटोले बोलत होते. ओबीसी आरक्षणावर बोलताना नाना पटोले म्हणाले केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. राज्य सरकारने राज्य ओबीसी आयोगाच्या माध्यमातून डाटा संकलन करण्याची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत अहवाल तयार होईल, अशी आशा पटोले यांनी व्यक्त केली. 

म्हणून दिला मनसेला युतीचा प्रस्ताव 
भाजपची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. कुठलेच मोठे पक्ष सोबत नसल्याने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे जनाधार घसरल्याचे व पराभवाच्या भीतीचे लक्षणे आहेत. यावेळी नाना पटोले यांनी २८ ऑगस्टला स्थापना दिनाच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in