`शेतकऱ्यांना थेट बांधावर खते, कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात हयगय नको'

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषी तंत्रज्ञानाबाबत दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून काटेकोर नियोजन करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
farmers will get fertilizers, agro technology in farms says ajit pawar
farmers will get fertilizers, agro technology in farms says ajit pawar

पुणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषी तंत्रज्ञानाबाबत दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून काटेकोर नियोजन करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत खत मागणी व पुरवठा, कृषि निविष्ठा विक्रेत्यांची संख्या, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांसाठी नमुन्याचे नियोजन, संनियत्रणासाठी स्थापन केलेली भरारी पथके, संनियंत्रण कक्ष, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानासंदर्भात चर्चा झाली. त्यात त्यांनी वरील सूचना केली.

पुणे जिल्हयात २ लाख ३० हजार ९३७ हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी, मका, नाचणी, सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी २६ हजार क्विंटल बियाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारे बियाणे दर्जेदार असावे, असे त्यांनी सांगितले.

कृषि विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते, कृषि तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करु नका, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच यावेळी मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, खरीप, रब्बी पीक कर्जवाटप, विंधन विहीर दुरुस्ती, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com