फडणवीस म्हणतात, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा..

राज्यात येणारी तिसरी लाट ही भयंकर असून त्याची तयारी करणे अत्यंत महत्वाचे आहे. राज्यसरकारने देखील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Devedra Fadanvis review Meeting news Hingoli
Devedra Fadanvis review Meeting news Hingoli

हिंगोली : कोरोनाची पहिली व दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Fadnavis says, get ready for the third wave of Corona, said devendra Fadanvis) हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील कोरोना बाधितांची घटती संख्या व मृत्यूदर याबद्दल समाधान व्यक्त करतांनाच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या कामाचे कौतुकही केले.

फडणवीस यांनी सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देत रुग्णांशी संवाद साधला पीएम  केअर फंडातील व्हेंटिलेटचीही पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना फडणवीस म्हणाले, व्हेंटिलेटर संदर्भात काही ठिकाणी वाद झाले, परंतु येथील व्हेंटिलेटर उत्तमरित्या सुरू आहेत. ( ventilators are working perfectly.) आता राज्यात येणारी तिसरी लाट ही भयंकर असून त्याची तयारी करणे अत्यंत महत्वाचे आहे. राज्यसरकारने देखील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

म्युकर मायकोसिसमुळे आतापर्यंत कोणीही मृत्युमुखी पडला नाही, ही समाधानाची बाबा आहे. म्युकर मायकोसिसचे इंजेक्शन महाग आहेत, किमान सहा ते सात इंजेक्शन रुग्ण बरे होण्यासाठी लागतात. (Patients should get free benefits from Mahatma Phule Yojana) राज्यात सध्या पाच हजाराच्या वर रुग्ण आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने  या रुग्णांना महात्मा फुले योजनेतून मोफत लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. 

सरकारी असो की खाजगी रुग्णालयात भरती असलेल्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना मोफत इंजेक्शन दिले पाहिजे. पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स दर्जा देण्याची गरज असून राज्य सरकारने पत्रकारांच्या या मागणीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे म्हणत  मराठा ओबीसी अरक्षणाबाबत राज्य शासनाची भूमिका नकारात्मक राहिल्याने ओबीसींचे आरक्षण कमी झाले असा आरोपही फडणवीस यांनी केला.

खरीप हंगाम येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांना बी बियाणे, खते खरेदीसाठी बँकांनी कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण खूपच कमी आहे. जिल्हा बँकांची परिस्थिती देखील चांगली नसल्याचे सांगत कर्ज वाटपाचे नियोजन योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे ,जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते , नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com