मुख्यमंत्री असतानाही जिल्ह्यात सेनेला गळती, शहरात पडली फूट...

नागपूर शहराचे नेतृत्व आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर सोपवण्यात आले. नवीन कार्यकारिणी करताना जुन्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी डिमोशन करून आपल्या समर्थकांना बढती दिली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी फूट पडली आहे.
मुख्यमंत्री असतानाही जिल्ह्यात सेनेला गळती, शहरात पडली फूट...
Uddhav Thackeray

नागपूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. Shivsena's Chief Uddhav Thackeray is become Chief Minister of the state त्यानंतर राज्यभर शिवसेना आता वाढेल, अशी अपेक्षा निष्ठावान शिवसैनिकांना होती. पण नागपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मात्र पुरता हिरमोड झाला आहे. सत्ता असतानाही कामे होत नसल्याने शिवसैनिक आधीच नाराज आहेत आणि शहरासाठी दिलेले नेतृत्व थोपवले गेले असल्यामुळे शहरात फूट पडली आहे, तर ग्रामीणमध्ये गळती लागली आहे. Shivsena is liking in the district. 

राज्याचा मुख्यमंत्री शिवसैनिक असतानाही नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सेनेला गळती लागली आहे. वर्षभरात तीन तालुका प्रमुखांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही सेनेसाठी धोक्याची घंटा असून असेच सुरू राहिले तर रामटेक लोकसभा मतदारसंघही गमवायला वेळ लागणार नाही, असे मानले जात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनेत उत्साह निर्माण होईल, युतीच्या जोखडातून सुटका झाल्याने भाजपचा दबाव झुगारून विस्तारलाही मोठा वाव मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात नवे चेहरे शिवसेनेने दिले. त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होताना दिसत आहे. शहरात मोठी फूट पडली आहे तर ग्रामीणमध्ये गळती लागली आहे. भिवापूरचे तालुका प्रमुख शेखर दडमल आणि कुहीचे तालुका प्रमुख हरीश कडव काँग्रेसवासी झाले आहेत. एकेकाळी शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य तापेश्वर वैद्य आधीच शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्यावर शिवसेनेचे सहयोग सदस्य होण्याची वेळ ओढवली आहे. 

दिवसेंदिवस शिवसेनेतील खदखद वाढत चालली आहे. शासकीय समित्यांवर नेमणूक केली जात नाही. काँग्रेसची कुरघोडी सुरू आहे. सत्ता असतानाही कामे होत नसल्याने त्यापेक्षा काँग्रेस बरी अशी भावना शिवसैनिकांमध्ये बळावत चालली आहे. त्यामुळे पक्ष सोडणाऱ्यांची संख्या आणखी वाढलेली दिसेल असे एका निष्ठावंताने सांगितले. समित्या वाटपाचे सूत्र ठरले असतानाही पालकमंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार शिवसेनेला प्रतिनिधित्व देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तालुका प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत आघाडी कायम असतानाही काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा करण्याचेही टाळले. शेवटपर्यंत झुलवत ठेवले. अखेर शिवसैनिकांनी स्वबळावर अर्ज दाखल केले होते. 

शहरातही असंतोष 
नागपूर शहराचे नेतृत्व आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर सोपवण्यात आले. नवीन कार्यकारिणी करताना जुन्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी डिमोशन करून आपल्या समर्थकांना बढती दिली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी फूट पडली आहे. कार्यकारिणीत समावेश केलेल्यांनी अद्यापही पदभार स्‍वीकारला नाही. काहींनी पदांचे राजीनामे दिले. ते सर्व ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.